ढाणकी प्रतिनिधी -हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र हरदडा येथील पुरातन अमृतेश्वर महादेव मंदिरात पवित्र श्रावण महिन्यानिमित्त भाविकांचा जनसागर उसळला आहे. श्रावण महिन्यात महादेवाची आराधना आणि पूजा-अर्चा करण्याला विशेष धार्मिक महत्त्व असल्याने, दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिरात भजन, कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण परिसर शिवनामघोषाने दुमदुमून गेला आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी भगवान शिवाची विशेष पूजा करून 'शिवमूठ' वाहण्याची प्राचीन परंपरा आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर अ…
राजकारणात अनेकदा पद, सत्ता आणि पक्षबदल यांचीच चर्चा अधिक रंगते. अशा वातावरणात काही माणसे अशी असतात, ज्यांची ओळख केवळ राजकारणापुरती मर्यादित राहत नाही. समाजातील सुख-दुःखात सहभागी होणे, गरजवंतांच्या पाठीशी उभे राहणे आणि विचारांशी एकनिष्ठ राहणे ही त्यांची खरी ताकद ठरते ढाणकी शहरातील याचे जिवंत उदाहरण म्हणजे संभाजी गोरटकर हे अशाच व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत. मतदानाचा हक्क मिळाल्यापासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी त्यांची नाळ जुळली. काळ बदलला, पक्षात अनेक घडामोडी घडल्या, अनेक पदाधिकारी वेगवेगळ्या वाटेने गेले; मात्र संभाजी गोरटकर…
ढाणकी : - घरकुल चे थकीत हप्ते , वाढीव मालमत्ता कर , मोकाट जनावरे ,व पाणीपुरवठा संदर्भात ढाणकी नगरपंचायतकडून कोणतीही दखल घेतल्या जात नसल्याने नागरिक त्रस्त झाले होते. झोपेचे सोंग घेतलेल्या नगरपंचायत प्रशासनाला व लोकप्रतिनिधीला जागे करण्यासाठी बाळासाहेब चंद्रे पाटील यांच्या नेतृत्वात स्वातंत्र्यदिनी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले .नगरपंचायत च्या कारभाराबद्दल नागरिकांची प्रचंड नाराजी व त्यांच्या संतप्त भूमिका या आंदोलनातून दिसून आल्या .प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतल्यानंतर खासदार नागेश …
ग्रामीण भागातील पत्रकारांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासोबतच पत्रकारांच्या हक्कांसाठी संघटितपणे कार्य करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाची उमरखेड तालुका कार्यकारणी नुकतीच गठीत करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष म्हणून मैनोद्दीन सौदागर, तालुका उपाध्यक्ष म्हणून राजू गायकवाड, सचिव म्हणून अतिश वटाणे, कोषाध्यक्ष म्हणून ज्ञानेश्वर राठोड, सहसचिव म्हणून हरिदास इंगोलकर सर, सहकोषाध्यक्ष म्हणून गजानन नावडे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच सदस्य म्हणून विनोद गाडगे व गोपीचंद दोडके यांची निवड करण्यात आली. सदर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या न…
ढाणकी प्रतिनिधी -निसर्गाचे अद्भुत वरदान लाभलेला प्रसिद्ध सहस्त्रकुंड धबधबा आणि लगतचे पैनगंगा अभयारण्य सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचा मुख्य केंद्रबिंदू ठरत आहे. पावसाळ्याच्या दिवसांत धबधब्याचा फेसाळणारा प्रवाह, सभोवतालचे घनदाट जंगल, हिरवेगार गवताचे गालिचे आणि पक्ष्यांचा सुमधुर किलबिलाट यामुळे संपूर्ण परिसर निसर्गप्रेमींना अक्षरशः भुरळ घालत आहे. सुट्टीच्या दिवशी स्थानिक जिल्ह्यांसह दूरवरून पर्यटक या निसर्गसौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी गर्दी करत आहेत. धबधब्याच्या दुसऱ्या बाजूला (मराठवाडा भागात) स्वयंभू शंभू महादेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे. "भक्तांच…
बंदी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र कोर्टा येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कृष्णदास बनोत व डॉ. क्रांतीकुमार नावंदीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उमरखेड तालुक्यातील शेवटचे 'सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा' (CPHC) प्रशिक्षण सत्र पार पडले. या सत्रात प्राथमिक आरोग्य केंद्र कोर्टा व थेरडी येथील कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले. यासाठी ग्रामीण रुग्णालय कळंबचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मधुकर मडावी, जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे डॉ. परशुराम किरवले, बाब…
ढाणकी प्रतिनिधी: यवतमाळ जिल्ह्यातील शेवटचे आणि तीन बाजूंनी घनदाट जंगलाने वेढलेले दराटी पोलीस स्टेशन नक्षलवादाच्या पार्श्वभूमीवर १९९२ साली स्थापन झाले आहे. शेजारील मराठवाड्यातील किनवट तालुक्यात पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी अवैध व्यावसायिकांचे कंबरडे मोडल्याने, त्यांनी या जंगलाचा फायदा घेत दराटी हद्दीत आपले बस्तान मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, नव्याने रुजू झालेले ठाणेदार गोपाळ इंद्राळे यांनी तत्परता दाखवत या अवैध व्यावसायिकांचा डाव उधळून लावला आहे. पुसद येथून सुमारे तीन महिन्यांपूर्वी दराटी पोलीस ठाण्यात बदलून आलेल्या गोपाळ इंद्राळे यांनी…
ढाणकी प्रतिनिधी -उमरखेड तालुक्यातील 'बोरी ते गाडी वळण' या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याचा मुख्य भाग मुसळधार पावसामुळे वाहून गेला असून, या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. रस्ता वाहून गेल्याने बोरी, गाडी आणि परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला असून नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाल्याने वाहने तर दूरच, पण पायी जाणाऱ्या गावकऱ्यांना आणि शाळकरी मुलांनाही जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. एवढी मोठी दुर्घटना घडल्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) अद्याप कोणतीही दुरुस्तीची पावले उचल…
ढाणकी प्रतिनिधी-शहरातील घरकुल धारकांचे थकीत हप्ते मिळणे, मालमत्तेवरील अवाजवी कर कमी करणे आणि गावठाण भूखंडांवरील दंडात्मक रक्कम रद्द करणे यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी ढाणकी शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी आणि नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या मागण्या १४ ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण न झाल्यास, येत्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी नगरपंचायत कार्यालयासमोर 'बोंब मारो' आंदोलन छेडण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे नगरपंचायत प्रशासनाला देण्यात आला आहे.या संदर्भातील निवेदन आज २९ जुलै २०२६ रोजी मुख्याधिकारी/नगराध्यक्ष, नगरपंचायत कार्यालय…
ढाणकी शहरातील पाणीटंचाई दिवसेंदिवस गंभीर होत असून जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यातही नागरिकांना पंधरा ते वीस दिवसांनी एकदाच पाणीपुरवठा होत आहे. पावसाळ्यात अशी परिस्थिती असेल, तर उन्हाळ्यात काय होईल, याचीच चिंता नागरिकांना सतावत आहे. नगरपंचायत दर्जाचे शहर असतानाही पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यात स्थानिक प्रशासन अपयशी ठरत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. शहरवासीयांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही नगरपंचायत व प्रशासनाची जबाबदारी असताना, या प्रश्नाकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा आरोप होत आहे. शहरातील नगरसेव…
ढाणकी प्रतिनिधी - जिल्हा पोलीस विभागात उल्लेखिनीय व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा आणि अमंलदारांचा सन्मान करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर बिटरगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार सहा. पोलीस निरीक्षक पांडुरंग शिंदे आणि पोलीस हवालदार संतोष चव्हाण यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता (भा.पो.से.) आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.Personal Loan Direct Apply पोलीस स्टेशन बिटरगाव येथे ठाणेदार म्हणून कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक प…
ढाणकी प्रतिनिधी -येथील स्थानिक कस्तुरबा गांधी कन्या विद्यालयात आषाढी एकादशी उत्सव २०२६ अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेतील विद्यार्थिनींनी आळंदी ते पंढरपूर अशा पारंपरिक वारीचे हुबेहूब दर्शन घडवणारी एक भव्य दिंडी काढली होती. उत्सवाच्या निमित्ताने शालेय परिसरात सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. विद्यार्थिनी पारंपरिक वारकरी वेशभूषेत (धोती, कुर्ता, नऊवारी साड्या आणि कपाळावर बुक्का) नटून थटून आल्यामुळे संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला होता. संत ज्ञानेश्वर माउलींच्या दिंडीचे विशेष आयोजन करण्यात आले हो…
ढाणकी प्रतिनिधी - भारताचे माजी राष्ट्रपती महान शास्त्रज्ञ मिसाईल मॅन भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त ढाणकी येथे अभिवादन करण्यात आले, भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या तैल चित्रास ढाणकी येथिल डॉ एपीजे अब्दुल कलाम चौक येथे सामाजिक कार्यकर्ते शेख शब्बीर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला, यावेळी आजाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत उर्फ जॉन्टी विणकरे यांनी माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत , स्वप्न ती नसतात जी आपण झोपेत पाहतो, स्वप्न ती असतात जी आपल्या…
ढाणकी प्रतिनिधी -श्री संत गाडगेबाबा वि.जा.भ.ज. माध्यम व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, ढाणकी येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने पालक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री आर. डी. चव्हाण हे होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री रामराव गायकवाड, श्री छबुराव धोपटे, श्री विलास जाधव, पत्रकार गोपाल गौरवाड व श्री अशोक गायकवाड उपस्थित होते. तसेच पत्की सर, अंडागळे सर व नाईक सर यांच्यासह शिक्षकवृंद मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री पहुरकर सर यांनी केले. सूत्रसंचालन शिंगणे स…
ढाणकी प्रतिनिधी: वाढदिवस म्हणजे केवळ केक कापणे किंवा कटआउट्स उभारणे नव्हे, तर तो समाजाच्या ऋणातून उतराई होण्याचा आणि सेवाकार्याचा दिवस असतो, हाच उदात्त संदेश देत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ढाणकी शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. दिनांक २३ जुलै रोजी शहरातील गंदेवार कॉम्प्लेक्स येथे पार पडलेल्या या शिबीराचे उद्घाटन ढाणकीचे माजी नगराध्यक्ष सुरेशलाल जयस्वाल यांच्या हस्ते उत्साहात झाले. नांदेड येथील 'नंदीग्राम ब्लड सेंटर अँड कंपोनंट लॅब'…
Social Plugin