ग्रामीण भागातील पत्रकारांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासोबतच पत्रकारांच्या हक्कांसाठी संघटितपणे कार्य करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाची उमरखेड तालुका कार्यकारणी नुकतीच गठीत करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष म्हणून मैनोद्दीन सौदागर, तालुका उपाध्यक्ष म्हणून राजू गायकवाड, सचिव म्हणून अतिश वटाणे, कोषाध्यक्ष म्हणून ज्ञानेश्वर राठोड, सहसचिव म्हणून हरिदास इंगोलकर सर, सहकोषाध्यक्ष म्हणून गजानन नावडे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच सदस्य म्हणून विनोद गाडगे व गोपीचंद दोडके यांची निवड करण्यात आली. सदर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अरुण देशमुख यांच्या हस्ते करण्यात आल्या. नवनियुक्त कार्यकारणीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पत्रकारांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी, पत्रकारांच्या मागण्या तसेच पत्रकारिता क्षेत्रातील प्रश्न प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी संघाच्या माध्यमातून प्रभावीपणे कार्य करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील पत्रकारांना एका व्यासपीठावर एकत्रित करून पत्रकारांच्या हितासाठी विविध उपक्रम राबविणे, पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण करणे तसेच सामाजिक व जनहिताच्या प्रश्नांना निर्भीडपणे वाचा फोडणे, हा संघाचा प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

0 टिप्पण्या