ढाणकी प्रतिनिधी- येथील मुरली बंधाऱ्यात पोत्यात बांधलेल्या अवस्थेत आढळलेल्या एका ३० ते ४० वयोगटातील तरुणाच्या मृतदेहाचे गूढ ११ दिवस उलटूनही कायम आहे. मृताची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले असून, आता या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र ओलांडून तेलंगणा आणि आंध्र प्रदेशपर्यंत पोहोचला आहे. मृताचा चेहरा पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटवण्यात अडचणी येत आहेत. यावर उपाय म्हणून बिट्टरगाव पोलिसांनी पुणे येथील तज्ज्ञांकडून मृताचे 'डिजिटल स्केच' तयार करून घेतले आहे. या स्केचच्या आधारे आता विदर्भ, मराठवाडा आणि तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती…
ढाणकी प्रतिनिधी: मुळावा येथील ऐतिहासिक धम्मदूत बुद्धविहार येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी १ आणि २ फेब्रुवारी २०२६ रोजी 'अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे' भव्य आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या परिषदेकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन डांबरीकरण करावे, अशी मागणी अॅड. डी. के. दामोधर यांच्या नेतृत्वाखाली निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवरांची उपस्थिती. या दोन दिवसीय धम्मपरिषदेसाठी श्रीलंकेचे खासदार पू. भदंत अतुरलिये रतन धेरो हे उद्घाटक म्हणून उपस्थित राहण…
ढाणकी प्रतिनिधी: मकरंसंक्रांत या सणाची महिला मोठ्या उत्साहाने वाट पाहत असतात. या सणाला महिला आपापल्या घरी मोठ्या आनंदाणा साजरे करतात. आपल्या गावातील परिचित सर्व महिला यांना बोलावून त्यांना हळदीकुंकू लावून,तीळ गूळ, वाण देऊन स्वागत केल्या जाते. स्वरांगिणी दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने मकर संक्रांतीच्या निमित्ताने 'हळदी-कुंकू' कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला गावातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, सुमारे २०० ते ३०० महिलांची उपस्थिती होती. भारतीय संस्कृतीतील सण-उत्सवांचे जतन करण्यासोबतच महिलांचे संघटन मजबूत…
ढाणकी प्रतिनिधी: येथील जिल्हा परिषद उर्दू हायस्कूलच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. यामध्ये सय्यद बबलू सय्यद सरदार यांची अध्यक्षपदी, तर शेख जुबेर शेख हबीब यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. स्थानिक पातळीवर ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती. शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडीकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले होते. अखेर, सदस्यांच्या चर्चेनंतर आणि सर्वांच्या संमतीने ही निवड करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. निवड प्रक्रिया पा…
ढाणकी नगरपंचायतीच्या सन २०२६ या वर्षासाठीच्या विविध विषय समित्यांच्या निवडीची प्रक्रिया नुकतीच उत्साहात पार पडली. विषय समित्या निवडी वेळी नियोजन समिती वगवण्यात आली. नियोजन समिती वागळल्या मुळे चार समितीवर सत्ता धारी व विरोधक यांना समाधान मानावे लागले. दोन्ही बाजू कडे समसमान संख्याबळ असल्यामुळे आज होणाऱ्या विषय समित्या कडे नागरिकांचे लक्ष लागून होते. उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि नगरपंचायत मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड प्रक्रिया राबवण्यात आली. यामध्ये सत्ताधारी व विरोधक यांच्या कडून चार ह…
ढाणकी प्रतिनिधी: विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या प्रसिद्ध सहस्त्रकुंड धबधब्याजवळील पैनगंगा नदी पात्रात एका ३० ते ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह गोणीत बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. हा प्रकार प्रथमदर्शनी खुनाचा असल्याचे समोर येत असून, बिटरगाव पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नेमकी घटना काय? सहस्त्रकुंड धबधबा आणि पैनगंगा अभयारण्याच्या घनदाट जंगलाचा फायदा घेत अज्ञात इसमांनी एका तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह गोणीत भरला आणि नदीपात्रात फेकून दिला. काल हा मृतदेह तरंगताना आढळून आल्यानंतर ही…
ढाणकी (प्रतिनिधी): शिक्षण म्हणजे केवळ पदवी मिळवणे नव्हे, तर आयुष्यातील संकटांशी दोन हात करण्याचे बळ मिळवणे होय. हेच ब्रीदवाक्य जपत सुमारे २५ वर्षांपूर्वी बिटरगाव (बु.) येथे विनोद सुधाकर गजभिये या तरुण शिक्षकाने सुरू केलेली 'नापासांची शाळा' आज पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. प्रतिकूल परिस्थितीत सुरू झालेल्या या 'मुक्तांगणाने' शेकडो मुलींच्या आयुष्याला नवी दिशा दिली असून, ही शाळा पुन्हा सुरू व्हावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. कुडाच्या घरापासून सुरू झाला प्रवास. बी.एड. पदवीधर असलेले विनोद गजभिये यांनी सामाजिक चळवळीचा वारसा जपत, गावात …
ढाणकी (प्रतिनिधी): मुरली बांधारा परिसरात आज सकाळी एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह पोत्यात (फारीत) बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सदर इसमाचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह नदीपात्रात फेकला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. दुर्गंधीमुळे प्रकार उघडकीस मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी काही स्थानिक नागरिक मुरली बांधाऱ्याच्या परिसरातून जात असताना त्यांना उग्र दुर्गंधी आली. परिसरात पाहणी केली असता, पाण्याजवळ एक पोते दोरीने घट्ट बांधलेल्या संशयास्पद स्थितीत पडलेले दिसले. नागरिकांनी त…
ढाणकी नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा अर्चना सुंदरकांता वासमवार यांचा पदग्रहण सोहळा आज, ८ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता नगरपंचायत सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि दोन्ही शिवसेना, काँग्रेस एम.आय.एम.च्या नेत्यांच्या साक्षीने हा सोहळा संपन्न झाला. विकासासाठी एकत्र येण्याचे खासदारांचे आवाहन. याप्रसंगी बोलताना खासदार नागेश पाटील आष्टीकर म्हणाले की, "ढाणकीतील मतदारांनी शिवसेनेवर जो विश्वास दाखवला आहे, त्याला तडा जाऊ दिला जाणार नाही. निवडणुका संपल्या आहेत, आता सर्व नगरसेवकांनी म…
काळ झपाट्याने बदलला, काळा सोबत माणसेही बदलली आणि त्यासोबतच वडिलोपार्जित वर्षानुवर्ष जपत चाललेली कलाही हरवत गेली. बहुरूपी कलावंत हा या समाजातील असा उपेक्षित घटक आहे जो काळाच्या ओघात झपाट्याने मागे पडला. वेगवेगळी सोंग घेऊन समाजाचे मनोरंजन करणे हा बहुरूपी कलावंतांचा मुख्य व्यवसाय आणि याच कलेच्या आधारावर त्यांनी वर्षानुवर्षे आपल्या कुटुंबाचा गाडा हाकला. आज A I च्या जगामध्ये बहुरूपी मात्र अशाप्रकारे हरवला की, समोरच्या पिढीला बहुरूपी कोण होता हे दाखवणे सुद्धा दुरापास्त झालेले आहे. सोमवार हा ढाणकी शहराचा बाजारचा दिवस असतो. या दिवशी खेड्यापाड्यातील मो…
Social Plugin