उमरखेड तालुक्यात भाजपचा 'युवा एल्गार'; 'युवा ग्रामशक्ती संघटन' अभियानाला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.


ग्रामीण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे संघटन तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि गाव तिथे कमळ हे ध्येय साध्य करण्यासाठी सुरू असलेल्या युवा ग्रामशक्ती संघटन अभियानाने उमरखेड तालुक्यात मोठी झेप घेतली आहे. तालुक्यातील विविध गावांमध्ये या अभियानाला तरुणांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून, मोठ्या संख्येने युवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राज्यभर राबवले जात आहे. उमरखेड तालुक्यात या अभियानांतर्गत ऊंचवड़द, दिघडी, खरूस बु., लोहरा, विडूळ, साखरा, पोफाली, मुळावा आणि चालगणी यांसारख्या प्रमुख गावांमध्ये बैठका आणि संवाद मेळावे पार पडले. ग्रामीण भागातील प्रत्येक तरुणाला पक्षाची विचारधारा आणि केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती देणे हा या दौऱ्याचा मुख्य हेतू आहे. हे अभियान नितीनभाऊ भुतडा व लोकप्रिय आमदार मा. किसनरावजी वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे. भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रोहित वर्मा यांच्या सक्षम नेतृत्वात हे दौरे आयोजित करण्यात आले असून, गावागावात नव्या सदस्य नोंदणीला वेग आला आहे. अनेक प्रभावशाली तरुणांनी भाजपच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून पक्षप्रवेश केला, ज्यामुळे तालुक्यात भाजपची ताकद वाढली आहे. या दौऱ्यादरम्यान जिल्हाध्यक्ष रोहित वर्मा यांनी तरुणांशी संवाद साधताना सांगितले की, "युवा शक्तीच्या एकजुटीतूनच गावाच्या विकासाचा मार्ग मोकळा होईल. उमरखेड तालुक्यातील तरुणांचा उत्साह पाहता आगामी काळात भाजपचे संघटन अधिक अभेद्य होईल. 'प्रत्येक गावात युवाशक्ती संघटन – प्रत्येक घरात कमळ' ही संकल्पना आम्ही सत्यात उतरवणार आहोत." या यशस्वी दौऱ्याप्रसंगी संदीप भाऊ हिंगमीरे, परमानंद पाटील कदम, धनराज पाटील वानखेडे, योगेश पाटील वानखेडे यांच्यासह धनंजय माने, मल्हार चंद्रे, ज्ञानेश्वर मांगरूळकर, देवा देवकत्ते, विनायक अक्कावार तसेच जिल्हा व स्थानिक स्तरावरील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या