नवनिर्वाचित नगराध्यक्षा अर्चनाताई वासमवार यांनी घेतला स्वच्छता अभियानाचा आढावा. लोकप्रतिनिधी उतरले प्रत्यक्ष मैदानात.


ढाणकी नगरपंचायतच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. अर्चनाताई सुंदरकांता वासमवार यांनी ग्राम स्वच्छतेला प्रथम प्राधान्य देत शहरातील विविध प्रभागात स्वतः हजर राहून स्वच्छतेबाबत आढावा घेतला.   ढाणकी शहरातील प्रभाग क्र. 1, 5 आणि 6 मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कचऱ्याचे मोठे ढीग साचले होते. यामुळे दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. या गंभीर समस्येची दखल घेत नगराध्यक्षांनी पदभार स्वीकारताच या कचरा कोंडीतून शहराला मुक्त करण्याचा विडा उचलला आहे. या मोहिमेत नगराध्यक्षांना प्रभागातील नगरसेवकांनीही मोलाची साथ दिली आहे. यात प्रामुख्याने परमेश्वर निमलवाड नगरसेवक, प्रभाग क्र. 1 ,  उमेश योगेवार नगरसेवक प्रभाग क्र. 5, यास्मिन अख्तर मुन्नवर रहमान प्रभाग क्र. 6 या सर्वा नगरसेवकांनी कंबर कसून नगरपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून युद्धपातळीवर कचरा उचलण्याचे काम सुरू केले आहे.  कचरा हटवून हा परिसर आता चकाचक करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे स्वच्छचे नंतर शहरातील ज्वलंत अशा पाणी प्रश्नावर नगरपंचायत प्रशासन कायमस्वरूपी तोडगा काढील अशी आशा शहरातील नागरिक करत आहेत. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनासोबतच नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी नगराध्यक्षा अर्चनाताई वासमवार यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या