नुकतीच भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षांची निवड झाली. निवड झाल्याबद्दल कृष्णराज धनंजय महाडिक यांची भेट घेऊन त्यांचे भाजपा युवा मोर्चा ढाणकी यांच्या तर्फे अभिनंदन करण्यात आले. या भेटीदरम्यान झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यकर्त्यांना कार्यासाठी नवा हुरूप मिळाला असून ही भेट प्रेरणेचा अखंड स्रोत ठरली असल्याची भावना भाजयुमो जिल्हाध्यक्ष रोहित वर्मा यांनी व्यक्त केली. सध्या भाजपच्या ग्रामीणशक्ती संघटन अभियान अंतर्गत गाव तेथे भाजपची शाखा उभी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जिल्हाध्यक्ष रोहित वर्मा यांच्या नियोजनाखाली अनेक गावांतील युवाशक्ती या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहे. या अभियानाला मिळणारे यश हे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या प्रेरणेतूनच मिळत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. होळीच्या पावन दिवशी झालेल्या या भेटीत प्रदेशाध्यक्षांसोबत विविध संघटनात्मक विषयांवर अर्धा तास सविस्तर चर्चा झाली. यावेळी कृष्णराज महाडिक यांनी कार्यकर्त्यांना आश्वस्त केले की, कार्यकर्ता हाच भाजपचा खरा आधार आहे. पक्ष सदैव कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील आणि त्यांना कोणताही त्रास होऊ दिला जाणार नाही. या भेटीनंतर बोलताना रोहित वर्मा यांनी सशक्त युवक – सक्षम संघटन – समृद्ध गाव हा नारा दिला. संघटित युवा शक्तीच्या जोरावर गावागावात कमळ अधिक बळकट करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी बोलून दाखवला. प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे अभिनंदन करताना भाजयुमो जिल्हाध्यक्ष रोहित वर्मा यांच्यासह नगरसेवक मल्हार चंद्रे, साहिल चंद्रे, राम चंद्रे, धनराज वानखेडे, विष्णू फुलेवार व इतर सहकारी उपस्थित होते.

0 टिप्पण्या