ढाणकी : - घरकुल चे थकीत हप्ते , वाढीव मालमत्ता कर , मोकाट जनावरे ,व पाणीपुरवठा संदर्भात ढाणकी नगरपंचायतकडून कोणतीही दखल घेतल्या जात नसल्याने नागरिक त्रस्त झाले होते. झोपेचे सोंग घेतलेल्या नगरपंचायत प्रशासनाला व लोकप्रतिनिधीला जागे करण्यासाठी बाळासाहेब चंद्रे पाटील यांच्या नेतृत्वात स्वातंत्र्यदिनी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले .नगरपंचायत च्या कारभाराबद्दल नागरिकांची प्रचंड नाराजी व त्यांच्या संतप्त भूमिका या आंदोलनातून दिसून आल्या .प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतल्यानंतर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी भ्रमणध्वनीवरून आंदोलकांशी संवाद साधला व ढाणकी करांच्या सर्व समस्या एका महिन्यात सोडवायचे आश्वासन दिल्यानंतर तसेच मुख्याधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर सदर आंदोलन स्थगित करण्यात आले .
नगरपंचायत मधील विविध समस्या संदर्भात सात ऑगस्ट रोजी निवेदन देऊन त्वरित कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. अन्यथा 15 ऑगस्ट रोजी बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा सर्वपक्षीय नेत्यांनी दिल्यानंतर सुद्धा कोणतीही कारवाई न झाल्यामुळे अखेर आज आंदोलन करण्यात आले. आंदोलनांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता . आज १५ ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता सोसायटीच्या कार्यालयापासून डफडे वाजवत हातात तिरंगा झेंडे घेत रॅली काढण्यात आली. सदर रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक जुने बस स्टॅन्ड वरून नगरपंचायत कार्यालयावर धडकली यावेळी संतप्त नागरिकांनी नगरपंचायत कार्यालयात जाऊन घोषणा दिल्या तसेच नगरपंचायतच्या प्रांगणामध्ये ठिय्या आंदोलन करीत नगरपंचायत प्रशासनाविरोधात बोंबाबोंब आंदोलन केले. ढाणकीकरांसाठी महत्त्वाचा असलेल्या पाणीपुरवठा कडे लक्ष देऊन अनेक प्रभागात नादुरुस्त असलेल्या वाल दुरुस्त करून पाणीपुरवठा करण्यात यावा ,घरकुल योजनेला प्रतिसाद देत अनेकांनी घरी बांधली परंतु त्यांना निधी वितरत होत नसल्याने अनेक घरकुलाचे बांधकाम करणे असून यामुळे अनेक कुटुंब उघड्यावर आले त्यांना त्वरित थकीत हप्ते खात्यात जमा करण्यात यावे , वाढीव मालमत्ता कर रद्द करण्यात यावा ,गावठाण भूखंडाच्या नोंदी वरील दंडात्मक रक्कम रद्द करण्यात यावी , मोकाट जनावरे कुत्रे व गाढवांचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा यासह इतर मागण्यासाठी ढाणकी आक्रमक झाले होते . " हमारी मांगे पुरी करो अन्यथा खुर्ची खाली करो " विकास होत नसल्याने "नगरपंचायत रद्द करून ग्रामपंचायतचा दर्जा देण्यात यावा " या घोषणेने नगरपंचायत परिसर दणाणून गेला होता .सदर आंदोलनात काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब चंद्रे पाटील , मनसे तालुकाप्रमुख सादिक शेख , आझाद समाज पार्टी जिल्हाध्यक्ष जॉन्टी विनकरे ,काँग्रेस शहराध्यक्ष गजानन मिटकरे , शेख जहीर भाई , किशोर ठाकूर ,वंचित तालुकाध्यक्ष संबोधी गायकवाड , राहुल नरवाडे , काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अमोल तुपेकर , राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष मंतेवाड , सोसायटीचे अध्यक्ष बंटी वाळके विश्वास धुळे , शे अम्मुभाई , शे. अनिस ,शिवाजी वैद्य , शे. खालिद भाई , माजी ग्रा प सदस्य बशीर भाई , शे सरवर भाई ,बाबुराव नरवाडे ,छबुराव धोपटे , शेख जुबेर , आनंद पोपुलवाड, शेख गुडू भाई , राजु पाटील , राहूल चंद्रे , शाहरूख पठाण , पप्पु गायकवाड , शेख अफरोज सह ढाणकीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .


0 टिप्पण्या