माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ अब्दुल कलाम यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन .


ढाणकी  प्रतिनिधी- भारताचे माजी राष्ट्रपती महान शास्त्रज्ञ मिसाईल मॅन  भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त ढाणकी  येथे अभिवादन करण्यात आले, भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या तैल चित्रास  ढाणकी येथिल डॉ एपीजे अब्दुल कलाम चौक येथे सामाजिक कार्यकर्ते शेख शब्बीर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला, यावेळी आजाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत उर्फ जॉन्टी विणकरे यांनी माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत , स्वप्न ती नसतात  जी आपण झोपेत पाहतो, स्वप्न ती असतात जी  आपल्याला झोपू देत नाहीत, हे डॉ अब्दुल कलाम यांचे विचार सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत असे सांगितले ,या वेळी डॉ अब्दुल कलाम यांच्या जयघोषाच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी , आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष जॉन्टी विणकरे  ,शेख शब्बीर ,शेख अमीन, सय्यद अनिस, शेख इरफान, शेख साजिद, शाहरुख पठाण,शेख इमरान भाई,शेख शादुल भाई, शेख सुलतान, सुरज पाटील रावते, , शेख कामिल, शेख मुदसीर, शेख सलीम, शेख अज्जू, शेख बबलू, शेख साहिल, शेख सोनू,आयुब पठाण,फिरोज पठाण , शेख मोसिन, शेख कलीम, शेख फारुख, शेख सोहेल  जय कानींदे, सुशांत गायकवाड, चंद्रमणी काळबांडे उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या