ढाणकी प्रतिनिधी -श्री संत गाडगेबाबा वि.जा.भ.ज. माध्यम व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, ढाणकी येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने पालक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री आर. डी. चव्हाण हे होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री रामराव गायकवाड, श्री छबुराव धोपटे, श्री विलास जाधव, पत्रकार गोपाल गौरवाड व श्री अशोक गायकवाड उपस्थित होते. तसेच पत्की सर, अंडागळे सर व नाईक सर यांच्यासह शिक्षकवृंद मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री पहुरकर सर यांनी केले. सूत्रसंचालन शिंगणे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री विशाल चव्हाण सर यांनी केले. सभेमध्ये विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती, शिस्त, मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम, अल्पवयीन विद्यार्थ्यांनी मोटारसायकल चालविण्याचे धोके, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी राबविण्यात येणारे विविध शैक्षणिक उपक्रम तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती पालकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात आली. यावेळी पालकांनीही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शाळेला सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुडे सर, वाठोरे सर, जोगदंड सर, कटके मॅडम, सोयाम सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या पालक सहविचार सभेसाठी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.

0 टिप्पण्या