ठाणेदार पांडुरंग शिंदे, पोलीस अंमलदारसंतोष चव्हाण यांचा पोलीस अधीक्षकांकडून गौरव; प्रशस्तीपत्र देऊन सन्मान.



ढाणकी प्रतिनिधी- जिल्हा पोलीस विभागात उल्लेखिनीय व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा आणि अमंलदारांचा सन्मान करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर बिटरगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार सहा. पोलीस निरीक्षक पांडुरंग शिंदे आणि पोलीस हवालदार संतोष चव्हाण यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता (भा.पो.से.) आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.Personal Loan Direct Apply

पोलीस स्टेशन बिटरगाव येथे ठाणेदार म्हणून कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग शिंदे यांनी जुन्या गुन्ह्यांच्या दोषसिद्धीच्या प्रमाणात 'प्ली-बारगेनिंग' अंतर्गत अत्यंत भरीव, उल्लेखनीय व कौतुकास्पद कामगिरी केली आहे. त्यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळेच कर्तव्यतत्परतेचा हा बहुमान त्यांना प्रदान करण्यात आला. Home Loan Interest Rates

बिटरगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार संतोष चव्हाण यांनी एका गंभीर महिला संदर्भातील गुन्ह्यात अत्यंत तत्परतेने तपास चक्र फिरवले. त्यांनी आरोपींविरुद्ध सबळ पुरावे गोळा करून, गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या २४ तासांच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले. महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या या गुन्ह्यात त्यांनी दाखवलेली तत्परता आणि उत्कृष्ट कामगिरी अत्यंत प्रशंसनीय ठरली आहे. Mutual Fund SIP Return

या उल्लेखनीय व कौतुकास्पद कामगिरीबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ठाणेदार पांडुरंग शिंदे आणि पोलीस हवालदार संतोष चव्हाण यांचे विशेष कौतुक केले असून पोलीस दलातून व परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. Best Credit Card in India,


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या