आर्य वैश्य समाजाचे कुलदैवत माता कन्यका परमेश्वरी (वासवी माता) यांचा जन्मोत्सव ढाणकी येथे अत्यंत उत्साह, भक्ती आणि पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. वासवी माता मंदिरात आयोजित या सोहळ्याने संपूर्ण परिसर भाविकांच्या गर्दीने आणि जयघोषाने दुमदुमून गेला होता. या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिलांची शिस्तबद्ध उपस्थिती होती. नवनवीन पेहरावात सजलेल्या महिला आणि उत्साही युवक व ज्येष्ठ नागरिकांच्या सहभागाने हा जन्मोत्सव सोहळा अधिकच उठावदार झाला. जन्मोत्सवानिमित्त मंदिरात दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. मातेच…
सध्या सोन्याचा भाव खात असलेल्या हळदीवर डल्ला मारणाऱ्या चोरट्याचा बिटरगाव पोलिसांनी छडा लावला आहे. ढाणकी येथील शेतातून चोरलेली हळद जप्त करत पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे. ढाणकी येथील शेतकरी शेख हमीद शेख फकरू यांच्या शेतातून काल रात्री अज्ञात चोरट्यांनी 2 क्विंटल हळदीची पोती लांबवली होती. बाजारभावानुसार या हळदीची किंमत 24000 रुपये इतकी होती. शेतकऱ्याने तातडीने बिटरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. हळदीचे वाढते दर पाहता ही चोरी परिसरात च…
ढाणकी ते उमरखेड या मुख्य मार्गाचे काम सध्या कासव गतीने सुरू असून, हे काम प्रवाशांच्या जीवावर बेतत आहे. रस्त्यावर टाकलेल्या कच्च्या मुरमामुळे संपूर्ण परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे आणि कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे वाहनचालकांना, विशेषतः दुचाकीस्वारांना श्वास घेणेही कठीण झाले आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर मुरूम टाकून ठेवण्यात आला आहे, परंतु त्यावर नियमित पाणी फवारणी केली जात नाही. परिणामी, एखादे मोठे वाहन गेले की धुळीचे एवढे मोठे लोट उठतात की मागून येणाऱ्या दुचाकीस्वाराला समोरील रस्ताच दिसत नाही. यामुळे या मा…
येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने श्री स्वामी समर्थ महाराजांचा पुण्यतिथी सोहळा आणि शिवमहापुराण कथा अत्यंत नियोजनबद्ध आणि भव्य स्वरूपात पार पडला. केंद्र प्रमुख सौ. पूनम ताई चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सोहळ्याने संपूर्ण ढाणकी परिसरात भक्तीचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे. कार्यक्रमाची सुरुवात 5 एप्रिल रोजी पाचोरा धामच्या शिवयोगिनी जया महादेव शंकर यांच्या अमृतवाणीतून शिवमहापुराणकथेने झाली. पाच दिवस चाललेल्या या कथाश्रवणासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. शिवयोगिनींच्या रसाळ निरूपणाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले होते.…
ढाणकी प्रतिनिधी -भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज ढाणकी शहरात एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. ढाणकी शहर पत्रकार संघाच्या वतीने स्थानिक आठवडी बाजार परिसरातील बौद्ध विहार पटांगणावर भव्य संविधान वाटप सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते संविधान अभ्यासक डॉ. प्रा. अनिल काळबांडे यांनी आपल्या मार्गदर्शनात संविधानाचे महत्त्व विशद केले. प्रत्येक नागरिकाने संविधानाचे वाचन करून त्यातील मूल्यांचे जतन करणे हीच डॉ. बाबासाहेबांना खरी ठरेल,असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमा…
ढाणकी प्रतिनिधी- कर्तव्यदक्षता, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या पोलीस दलातील एका अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा यथोचित गौरव आज झाला आहे. बिटरगाव पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले गजानन कनाके यांची नुकतीच पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी पदोन्नती झाली आहे. विशेष म्हणजे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनीच त्यांना हा सन्मान मिळाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. कनाके साहेबांनी वयाची 55 वर्षे ओलांडली असली, तरी त्यांचा कामातील तत्परता आणि शारीरिक फिटनेस पाहून आजही एखादा तरुण लाजेल अशी त्यांची ऊर्जा आहे. पोलीस दलात …
ढाणकी प्रतिनिधी - ज्या पुलाने दोन प्रदेशांना जोडले, त्याच पुलाने एका कुटुंबाचा आधार हिरावून घेतला आहे. उमरखेड तालुक्यातील खरबी येथील पैनगंगा नदीच्या पुलावर कठडे नसल्यामुळे शनिवारी रात्री भीषण अपघात झाला. दुचाकी थेट नदीपात्रात कोसळल्याने वृद्ध आजीचा जागीच मृत्यू झाला, तर नातू मृत्यूशी झुंज देत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या झोपे मुळे आणखी किती निष्पापांचे बळी जाणार? असा संतापजनक सवाल आता नागरिक विचारत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, धुपताबाई वामन साखरे आणि त्यांचा नातू सतीश इंगळे हे शनिवारी (दि. 11 एप्रिल) रात्री 9.30 च्या सुमारास कोर्टा (ता. …
बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ढाणकी पोलीस चौकी येथे आज पोलीस दलाच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला. पोलीस स्टेशनला प्राप्त झालेल्या तीन नवीन अत्याधुनिक वाहनांचा लोकार्पण सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याला उमरखेड-महागाव विधानसभेचे आमदार किसनराव वानखेडे आणि भाजपाचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते या वाहनांचे पूजन करून ती पोलीस दलाच्या सेवेत समर्पित करण्यात आली. बिटरगाव पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्राचा विस्तार आणि सुरक्षेची गरज लक्षात घेता, या नवीन अत्…
भगवान महावीर यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्मार्ट ग्रामपंचायत नागापूर येथील नयनरम्य टेकडीवरील राजीव गांधी भवन येथे उमरखेड तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला. महादिप उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय विमानफेरीसाठी पात्र ठरलेल्या ५५ विद्यार्थ्यांपैकी १० विद्यार्थी उमरखेड तालुक्यातील असून, तसेच नवोदय विद्यालयासाठी निवड झालेल्या ८० विद्यार्थ्यांपैकी १२ विद्यार्थी उमरखेड तालुक्यातील आहेत. या यशामुळे जिल्ह्यात उमरखेड तालुक्याचा सन्मान वाढला, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे आयोजक मा. जिल्हा शिक्षण समिती सदस्य चितांगराव कदम यांनी केले. महाद…
निसर्गाचा काही भरवसा नाही या उक्तीचा प्रत्यय सध्या ढाणकी आणि परिसरातील शेतकरी घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात झालेल्या अचानक बदलामुळे आणि अवकाळी पावसामुळे या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेला हळद आणि टरबुजाचा घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांवर आभाळ फाटल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. ढाणकी परिसरात सध्या हळद काढणी, उकडणे आणि ती वाळत घालण्याची कामे जोमाने सुरू आहेत. मात्र, अचानक आलेल्या पावसाने आणि ढगाळ वातावरणामुळे वाळत घातलेली हळद भिजली आहे. यामुळे हळदीच्या दर्जावर परिणाम होणार असून, शेतकऱ्यांचे लाख…
ढाणकी प्रतिनिधी - येथील जैन बांधवांच्या वतीने अहिंसा परमो धर्म चा संदेश देत भगवान महावीर यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरातून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले असून, संपूर्ण ढाणकी शहर भगवान महावीरमय झाले होते. सकाळी स्थानिक स्थानकापासून भगवान महावीरांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक शहरातील मुख्य बाजारपेठ आणि प्रमुख मार्गावरून मार्गस्थ झाली. यावेळी भगवान महावीर की जय आणि अहिंसा परमो धर्म अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. शहरातील ठिकठिकाणी आणि …
यवतमाळ प्रतिनिधी : येथील सारस्वत चौकातील हॉटेल ट्यूलिप ग्रीन गार्डनच्या सभागृहात आपले सरकार सेवा केंद्र हक्क संरक्षण असोसिएशन, महाराष्ट्र यांच्या वतीने प्रथम सर्वसाधारण सभेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या सभेला जिल्हाभरातील आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सभेच्या प्रारंभी संघटनेच्या उद्दिष्टांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी केंद्र चालकांना भेडसावणाऱ्या तांत्रिक अडचणी, प्रशासकीय स्तरावर प्रलंबित असलेल्या मागण्या तसेच केंद्र चालकांच्या हक्कांचे संरक्षण या महत्त्वाच्या विषयांवर …
महावितरणचा विस्कळीत वीज पुरवठा, स्मार्ट मीटरची सक्ती आणि सहाय्यक अभियंत्यांचा मनमानी कारभार यामुळे त्रस्त झालेल्या ढाणकीकरांचा संयम अखेर सुटला. आज सर्वपक्षीय पदाधिकारी आणि संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालयावर जोरदार धडक दिली. कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा यावेळी उपकार्यकारी अभियंता जाधव यांना निवेदनाद्वारे देण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून ढाणकी शहरात महावितरणच्या कारभाराबाबत प्रचंड असंतोष आहे. सहाय्यक अभियंता राहुल नाखले हे मुख्यालयी उपस्थित राहत नसल्याने ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण होत नाही. वा…
महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. दिनांक १३ डिसेंबर रोजी झालेल्या या परीक्षेत वसंतराव नाईक कृषी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बिटरगाव बु. येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सन २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेत विद्यालयातील अनुज देविदास हाके व समर्थ गजानन निरटवाड हे दोन विद्यार्थी पात्र ठरले असून त्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. या यशाबद्दल अहिल्यादेवी होळकर स्मारक संस्थेचे सचिव अॅड. दिलीप एडतकर, कार्यवाहक अनिल चेंडकाळे तसेच विद्यालयाचे…
पवित्र रमजान महिन्याच्या महिनाभराच्या कडक उपवासानंतर (रोझा), आज ढाणकी शहरात ईद-उल-फितर म्हणजेच रमजान ईद अत्यंत उत्साहात, आनंदाने आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी स्थानिक ईदगाह मैदानावर एकत्र येत सामूहिक नमाज अदा केली आणि देशात शांतता, समृद्धी व प्रगतीसाठी विशेष दुवा मागितली.स काळपासूनच मुस्लिम बांधवांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता. नवीन वस्त्रे परिधान करून अबालवृद्ध ईदगाहकडे नमाजसाठी रवाना झाले. महिनाभर अल्लाहची भक्ती आणि संयम पाळल्यानंतर आजचा दिवस हा आनंदाची पर्वणी ठरला. नमाज पठण झाल्यानंतर सर्वांनी एकमेकांना गळाभे…
Social Plugin