आर्य वैश्य समाजाचे कुलदैवत माता कन्यका परमेश्वरी (वासवी माता) यांचा जन्मोत्सव ढाणकी येथे अत्यंत उत्साह, भक्ती आणि पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. वासवी माता मंदिरात आयोजित या सोहळ्याने संपूर्ण परिसर भाविकांच्या गर्दीने आणि जयघोषाने दुमदुमून गेला होता. या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिलांची शिस्तबद्ध उपस्थिती होती. नवनवीन पेहरावात सजलेल्या महिला आणि उत्साही युवक व ज्येष्ठ नागरिकांच्या सहभागाने हा जन्मोत्सव सोहळा अधिकच उठावदार झाला. जन्मोत्सवानिमित्त मंदिरात दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. मातेची विधीवत पूजा, कुंकुमार्चन आणि भव्य महाआरती करण्यात आली. या भक्तीपूर्ण वातावरणानंतर उपस्थित सर्व समाजबांधवांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजातील ज्येष्ठांचे आणि कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याप्रसंगी किराणा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अतुल येरावार आणि उमरखेड नगरपालिकेचे स्वीकृत सदस्य बाळासाहेब कोडगीरवार यांनी मार्गदर्शन करताना समाजाच्या एकतेवर भर दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर्य वैश्य समाजाचे सचिव गजानन मामीडवार यांनी अतिशय प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन समाजाचे अध्यक्ष भैय्या कोडगीरवार यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजातील सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

0 टिप्पण्या