डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ढाणकीत संविधान वाटप सोहळा उत्साहात पडला पार. विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती.


ढाणकी प्रतिनिधी -भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज ढाणकी शहरात एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. ढाणकी शहर पत्रकार संघाच्या वतीने स्थानिक आठवडी बाजार परिसरातील बौद्ध विहार पटांगणावर भव्य संविधान वाटप सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते संविधान अभ्यासक डॉ. प्रा. अनिल काळबांडे यांनी आपल्या मार्गदर्शनात संविधानाचे महत्त्व विशद केले. प्रत्येक नागरिकाने संविधानाचे वाचन करून त्यातील मूल्यांचे जतन करणे हीच डॉ. बाबासाहेबांना खरी ठरेल,असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हा समन्वयक नितीनभाऊ भुतडा हे होते. या सोहळ्याला परिसरातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. यामध्ये आमदार किनसराव वानखेडे, ढाणकी नगराध्यक्षा सौ. अर्चना सुंदरकांता वासमवार, ठाणेदार पांडुरंग शिंदे, प्राध्यापक डॉक्टर अनिल काळबांडे, तसेच नगरपंचायत चे  नगरसेवक, यांच्यासह पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी ,स्थानिक नागरिक, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष म्हणून कृ.उ.बा.स. उमरखेड चे माजी सभापती बाळू पाटील चंद्रे यांनी जबाबदारी सांभाळली, तर स्वीकृत नगरसेवक रोहितजी वर्मा यांनी निमंत्रक म्हणून भूमिका बजावली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय भोसले, उपाध्यक्ष उदय पुंडे, सचिव नागेश महाजन, गजानन गांजेवाड, सुभाष कस्तुरे, स्वप्नील चिकाटे यांच्यासह मोहन कळमकर, ब्रह्मानंद मुनेश्वर, कैलास घुगरे, राहुल चोरे, विनोद गायकवाड, नंदू जाधव, पंजाब भूतनर, सुनील अक्कावार आणि इतर सदस्यांनी परिश्रम घेतले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे ढाणकी शहरात सर्वत्र कौतुक होत असून, मोठ्या संख्येने नागरिक या सोहळ्याला उपस्थित होते. कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भूतडा यांनी  बौद्ध विहाराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही तसेच पुढच्या जयंती पर्यंत विहाराचा कायापालट करणार असे आश्वासन दिले. संविधानाच्या प्रती वाटपासाठी गजानन मिटकरे, प्रमोद कांबळे, किशोर ठाकूर ज्यांनी विशेष सहकार्य दिले  त्यांचा सुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश महाजन यांनी पार पाडले तर आभार प्रदर्शन ब्रह्मानंद मुनेश्वर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या