महादिप व नवोदय परीक्षेतील यशामुळे जिल्ह्यात उमरखेडचा सन्मान – चितांगराव कदम


भगवान महावीर यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्मार्ट ग्रामपंचायत नागापूर येथील नयनरम्य टेकडीवरील राजीव गांधी भवन येथे उमरखेड तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला. महादिप उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय विमानफेरीसाठी पात्र ठरलेल्या ५५ विद्यार्थ्यांपैकी १० विद्यार्थी उमरखेड तालुक्यातील असून, तसेच नवोदय विद्यालयासाठी निवड झालेल्या ८० विद्यार्थ्यांपैकी १२ विद्यार्थी उमरखेड तालुक्यातील आहेत. या यशामुळे जिल्ह्यात उमरखेड तालुक्याचा सन्मान वाढला, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे आयोजक मा. जिल्हा शिक्षण समिती सदस्य चितांगराव कदम यांनी केले. महादिप विमानफेरीसाठी पात्र ठरलेले विद्यार्थी नागपूर ते बेंगळुरू विमानप्रवास करून इस्रो वैज्ञानिक केंद्राला भेट देऊन आले. यात सम्राट कांबळे (गंगनमाळ), पार्थ साखरे (चिंचोली सं.), दुर्वा वारे (जि.प. माध्य. उमरखेड), दिव्या नरवाडे (चालगणी), तृप्ती चंद्रवंशी (मारलेगाव), श्रेया कदम (चालगणी), सान्वी सगमे (विडूळ कन्या), अल्मिरा शेख (ढाणकी उर्दू), अलिना खान (ब्राह्मणगाव उर्दू) व मानवी मोटाळे (चिंचोली सं.) यांचा समावेश आहे. नवोदय विद्यालय, बेलोरा (ता. घाटंजी) साठी पात्र ठरलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत : वैभव खडसे (पोफाळी), संस्कृती खंदारे (तरोडा तांडा), हर्ष बचणे (कळमुला), आराध्या थोटे (चालगणी), दर्शन म्हैसकर, संचिका शितळे, वेदिका विनकरे, मयंक दवने (तेजमल गांधी विद्यालय, ब्राह्मणगाव), समर्थ गजानन निरटवाड, नयना बिट्टेवार, पवन रावते व अनुज देविदास हाके वसंतराव नाईककृषी माध्यमिक विद्यालय , बिटरगाव बु. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी विजय बेटेवाड उपस्थित होते. त्यांनी शिक्षकांना विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांसाठी प्रवृत्त करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. यावेळी विद्यार्थ्यांना फेटे बांधून सन्मानित करण्यात आले तसेच बॅग, पॅड व पेन भेट देण्यात आले. त्याचप्रमाणे उमरखेडचे कर्तव्यदक्ष तहसीलदार राजेश सुरडकर व त्यांच्या धर्मपत्नी डॉ. किरण सुरडकर यांचा यवतमाळ जिल्ह्यातील आदर्श तहसीलदार म्हणून निवड झाल्याबद्दल शाल, श्रीफळ व फेटा बांधून सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी “आपण ग्रामीण भागातील आहोत याचा न्यूनगंड बाळगू नये. आज भारतीय विद्यार्थी जागतिक कंपन्यांमध्ये उच्च पदांवर कार्यरत आहेत,” असे मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालक, मार्गदर्शक शिक्षक व केंद्रप्रमुखांचाही सन्मान करण्यात आला. मनोगत व्यक्त करताना गजानन निरटवाड (पालक), विजय चौधरी (केंद्रप्रमुख), अलविरा फारुखी मॅडम (शिक्षक प्रतिनिधी), कवडे सर व विद्यार्थिनी दिव्या नरवाडे यांनी आपले विचार मांडले.

जि.प. प्राथमिक शाळा पोफाळी येथील वैभव खडसे, स्वरा ढोरे, नमीरा पठाण, शाश्वत ठाकरे, नंदिनी तांबारे व रुद्र गुहाडे यांची सैनिक शाळेसाठी निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्वला कलाने मॅडम यांनी केले तर आभार पद्मावती लोमटे मॅडम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सविता कदम, गोदाजी जाधव, बापुराव कुर्मे, सतीश घोडके, नाना कदम, रावसाहेब कदम, छाया चाकोरे, सुनंदा जाधव, सुवर्णा कदम, सोनाली ठेंगे, ज्योती कदम, प्रताप आडे व मारोती ठेंगे यांनी सहकार्य केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या