महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. दिनांक १३ डिसेंबर रोजी झालेल्या या परीक्षेत वसंतराव नाईक कृषी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बिटरगाव बु. येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सन २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेत विद्यालयातील अनुज देविदास हाके व समर्थ गजानन निरटवाड हे दोन विद्यार्थी पात्र ठरले असून त्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. या यशाबद्दल अहिल्यादेवी होळकर स्मारक संस्थेचे सचिव अॅड. दिलीप एडतकर, कार्यवाहक अनिल चेंडकाळे तसेच विद्यालयाचे व्यवस्थापक पुंजाराम डोंगे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यालयाचे मुख्याध्यापक दामोदर खर्चे, पर्यवेक्षक कुमारी मंगला गावंडे तसेच प्राध्यापक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच वर्गशिक्षक कमलाकर दुलेवाड, सुभाष सुभलकवाड व शुभदा बिडवई यांचेही विशेष अभिनंदन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील व शिक्षकांना दिले.

0 टिप्पण्या