पवित्र रमजान महिन्याच्या महिनाभराच्या कडक उपवासानंतर (रोझा), आज ढाणकी शहरात ईद-उल-फितर म्हणजेच रमजान ईद अत्यंत उत्साहात, आनंदाने आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी स्थानिक ईदगाह मैदानावर एकत्र येत सामूहिक नमाज अदा केली आणि देशात शांतता, समृद्धी व प्रगतीसाठी विशेष दुवा मागितली.स काळपासूनच मुस्लिम बांधवांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता. नवीन वस्त्रे परिधान करून अबालवृद्ध ईदगाहकडे नमाजसाठी रवाना झाले. महिनाभर अल्लाहची भक्ती आणि संयम पाळल्यानंतर आजचा दिवस हा आनंदाची पर्वणी ठरला. नमाज पठण झाल्यानंतर सर्वांनी एकमेकांना गळाभेट घेऊन ईद मुबारक म्हणत शुभेच्छा दिल्या. यावेळी शिरखुर्म्याचा गोडवा आणि आनंदाचे वातावरण सर्वत्र ओसंडून वाहत होते. ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

0 टिप्पण्या