धडाका! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर यवतमाळात भाजपची महाभरती, शेकडो कार्यकर्तांचा भाजपमध्ये प्रवेश.


हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर यवतमाळ जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या ध्येयधोरणांवर विश्वास ठेवत  शेकडो प्रमुख कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या महाभरती मुळे महागाव-पुसद परिसरात  मोठा धक्का बसला आहे. यवतमाळ येथील भाजप जिल्हा कार्यालयात हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. भगवे झेंडे आणि भाजपच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. पक्ष प्रवेश घेणाऱ्यांमध्ये  रामाभाऊ लोंढे उपतालुका प्रमुख शिवसेना ठाकरे गट, रामेश्वर गिरी तालुका संघटक,  संजय राठोड जिल्हा परिषद महागाव सर्कल शाखाप्रमुख, अक्षय घरत अध्यक्ष एन एस यु आय, ए.बी.राव मिरजे जिल्हा सचिव, यांच्यासह दीपक गोणारकर, राजेंद्र घोटकर, गजानन गुडापे, कैलास कठाळे, संजय ठाकरे, ज्ञानेश पवार, ज्ञानदेव चव्हाण, युवराज चव्हाण, रमेश डहाणे, शेषराव महानार, विशाल पंडित, योगेश राठोड, देवरावजी सरतापे, अनिल मदनकर, भगवान शेळके, रघुनाथ पाकमोडे, शालिक राऊत, नितीन जाधव, दिगंबर गायकवाड, हिंमत देवकर, सतीश जोधाडे, सुधाकर हिवराळे, किसन गायकवाड, प्रशांत रितपूरकर, यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपचे 'कमळ' हाती घेतले. प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, माजी मंत्री मदनभाऊ येरावार, जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, जिल्हाध्यक्ष प्रा. प्रफुल्ल चव्हाण आणि पुसद जिल्हाध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा व्यक्त केली. या सोहळ्याला भाजप जिल्हा उपाध्यक्ष संतोष चव्हाण, जिल्हा सरचिटणीस रेखाताई कोठेकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रोहित वर्मा, दत्तात्रय रहाणे, नितीन शेंदुरकर, परमेश्वर पाटील कदम, धनराज पाटील वानखडे, कृष्णा निंबर्ते, राज धांडे, दिनेश कोठारी यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या