ढाणकी प्रतिनिधी-शहरातील घरकुल धारकांचे थकीत हप्ते मिळणे, मालमत्तेवरील अवाजवी कर कमी करणे आणि गावठाण भूखंडांवरील दंडात्मक रक्कम रद्द करणे यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी ढाणकी शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी आणि नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या मागण्या १४ ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण न झाल्यास, येत्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी नगरपंचायत कार्यालयासमोर 'बोंब मारो' आंदोलन छेडण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे नगरपंचायत प्रशासनाला देण्यात आला आहे.या संदर्भातील निवेदन आज २९ जुलै २०२६ रोजी मुख्याधिकारी/नगराध्यक्ष, नगरपंचायत कार्यालय…
ढाणकी शहरातील पाणीटंचाई दिवसेंदिवस गंभीर होत असून जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यातही नागरिकांना पंधरा ते वीस दिवसांनी एकदाच पाणीपुरवठा होत आहे. पावसाळ्यात अशी परिस्थिती असेल, तर उन्हाळ्यात काय होईल, याचीच चिंता नागरिकांना सतावत आहे. नगरपंचायत दर्जाचे शहर असतानाही पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यात स्थानिक प्रशासन अपयशी ठरत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. शहरवासीयांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही नगरपंचायत व प्रशासनाची जबाबदारी असताना, या प्रश्नाकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा आरोप होत आहे. शहरातील नगरसेव…
ढाणकी प्रतिनिधी - जिल्हा पोलीस विभागात उल्लेखिनीय व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा आणि अमंलदारांचा सन्मान करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर बिटरगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार सहा. पोलीस निरीक्षक पांडुरंग शिंदे आणि पोलीस हवालदार संतोष चव्हाण यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता (भा.पो.से.) आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.Personal Loan Direct Apply पोलीस स्टेशन बिटरगाव येथे ठाणेदार म्हणून कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक प…
ढाणकी प्रतिनिधी -येथील स्थानिक कस्तुरबा गांधी कन्या विद्यालयात आषाढी एकादशी उत्सव २०२६ अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेतील विद्यार्थिनींनी आळंदी ते पंढरपूर अशा पारंपरिक वारीचे हुबेहूब दर्शन घडवणारी एक भव्य दिंडी काढली होती. उत्सवाच्या निमित्ताने शालेय परिसरात सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. विद्यार्थिनी पारंपरिक वारकरी वेशभूषेत (धोती, कुर्ता, नऊवारी साड्या आणि कपाळावर बुक्का) नटून थटून आल्यामुळे संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला होता. संत ज्ञानेश्वर माउलींच्या दिंडीचे विशेष आयोजन करण्यात आले हो…
ढाणकी प्रतिनिधी - भारताचे माजी राष्ट्रपती महान शास्त्रज्ञ मिसाईल मॅन भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त ढाणकी येथे अभिवादन करण्यात आले, भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या तैल चित्रास ढाणकी येथिल डॉ एपीजे अब्दुल कलाम चौक येथे सामाजिक कार्यकर्ते शेख शब्बीर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला, यावेळी आजाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत उर्फ जॉन्टी विणकरे यांनी माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत , स्वप्न ती नसतात जी आपण झोपेत पाहतो, स्वप्न ती असतात जी आपल्या…
ढाणकी प्रतिनिधी -श्री संत गाडगेबाबा वि.जा.भ.ज. माध्यम व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, ढाणकी येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने पालक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री आर. डी. चव्हाण हे होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री रामराव गायकवाड, श्री छबुराव धोपटे, श्री विलास जाधव, पत्रकार गोपाल गौरवाड व श्री अशोक गायकवाड उपस्थित होते. तसेच पत्की सर, अंडागळे सर व नाईक सर यांच्यासह शिक्षकवृंद मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री पहुरकर सर यांनी केले. सूत्रसंचालन शिंगणे स…
ढाणकी प्रतिनिधी: वाढदिवस म्हणजे केवळ केक कापणे किंवा कटआउट्स उभारणे नव्हे, तर तो समाजाच्या ऋणातून उतराई होण्याचा आणि सेवाकार्याचा दिवस असतो, हाच उदात्त संदेश देत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ढाणकी शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. दिनांक २३ जुलै रोजी शहरातील गंदेवार कॉम्प्लेक्स येथे पार पडलेल्या या शिबीराचे उद्घाटन ढाणकीचे माजी नगराध्यक्ष सुरेशलाल जयस्वाल यांच्या हस्ते उत्साहात झाले. नांदेड येथील 'नंदीग्राम ब्लड सेंटर अँड कंपोनंट लॅब'…
ढाणकी प्रतिनिधी : पोलीस स्टेशन बिटरगावच्या वतीने हद्दीतील ढाणकी येथे भंगार दुकानदारांवर विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत चार भंगार दुकानांची कसून तपासणी करण्यात आली असून, संशयित स्वरूपाचा मुद्देमाल आणि 12 संशयित मोटारसायकली ताब्यात घेण्यात आल्या आहेत. पोलिसांनी केलेल्या तपासणीत चार मोटारसायकल इंजिन (मोसे), वायरचे बंडल आणि दोन बॅटऱ्या जप्त केल्या. तसेच गावातील इतर ठिकाणांहून आणखी आठ संशयित मोटारसायकल इंजिन ताब्यात घेण्यात आले. याशिवाय एकूण 12 संशयित मोटारसायकली पुढील चौकशीसाठी पोलीस स्टेशन बिटरगाव येथे आणण्यात आल्या आहेत. पोलिसांनी…
मृग नक्षत्राच्या सुरुवातीला काही प्रमाणात हजेरी लावल्यानंतर, ढाणकी परिसरामध्ये पावसाने अचानक पाठ फिरवली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे ऐन पिकांच्या वाढीच्या काळात शेतातील पिके कोमेजू लागली आहेत. त्यातच उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने, ढाणकी शहरात पुन्हा एकदा पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. सध्या शहराला तब्बल १५ दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत असून, संपूर्ण परिसरावर दुष्काळाचे भीषण सावट पसरले आहे. यावर्षी चांगला पाऊस होईल या आशेने शेतकऱ्यांनी महागडी बियाणे आणि खते खरेदी करून पेरण्या…
महावितरणचे कथित 'स्मार्ट' मीटर आणि सातत्याने येणाऱ्या भरमसाठ वाढीव वीज बिलांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या संतापाचा अखेर उद्रेक झाला. या त्रासाच्या विरोधात आज सर्वपक्षीय ढाणकी शहर बंदची हाक देण्यात आली होती. या आवाहनाला व्यापारी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपापली प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवली. बंदनंतर संतप्त नागरिकांचा एक भव्य महामोर्चा महावितरण कार्यालयावर धडकला, ज्यामुळे काही काळ परिसरातील वातावरण चांगलेच तापले होते. गेल्या काही दिवसांपासून स्मार्ट मीटरच्या तांत्रिक त्रुटी आणि अव्वाच्या सव्वा येणाऱ्या वीज बिलांमुळे ढाणकीकर…
ढाणकी प्रतिनिधी :जेवली गावात बुधवारी सकाळपासून एका पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने धुमाकूळ घालत महिला, पुरुष आणि लहान मुलांसह सुमारे १५ ते १६ नागरिकांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जखमी नागरिकांनी तातडीने सरकारी दवाखान्यात उपचार घेत अँटी-रेबीज लसीकरण सुरू केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुत्र्याने गावातील विविध भागांत फिरत अनेक नागरिकांवर अचानक हल्ला केला. काही जखमींना पुढील उपचार आणि अँटी-रेबीज इंजेक्शनसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येणार असल्याचे समजते. या घटनेनंतर गावकऱ्य…
ढाणकी प्रतिनिधी: विदर्भातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या सहस्त्रकुंड धबधब्याचे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी आलेल्या पुसद तालुक्यातील दोन पर्यटकांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत असलेल्या वनविभागाच्या लोखंडी सूचना फलकावर गाडी जोरदार धडकली. या अत्यंत भीषण अपघातात एका 21 वर्षीय तरूणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्याचा दुसरा सोबती गंभीर जखमी झाला आहे. सूरज राहुल मनवर (वय २१, रा. लोणी, ता. पुसद, जि. यवतमाळ) असे मृत पावलेल्या युवकाचे नाव असून, पृथ्वीराज रमेश शेजाळे (वय २३) हा यु…
ढाणकी प्रतिनिधी-महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी) ७८ वा वर्धापन दिन ढाणकी बसस्थानकावर मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने प्रवाशांचे स्वागत आणि विविध प्रबोधनात्मक विषयांवर चर्चा करण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माधवराव मिटकरे प्रवासी मंडळाचे अध्यक्ष हिरासिंह चव्हाण, कार्याध्यक्ष नाथा पाटील सचिव शेख इरफान गुलाब प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी बोलताना मान्यवरांनी एसटीच्या सर्वांगीण विकासावर प्रकाश टाकला, तसेच शासनातर्फे प्रवाशांना मिळणाऱ्य…
ढाणकी प्रतिनिधी - येथे गेल्या काही काळापासून निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईवर मात करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले होते. या प्रयत्नांना अखेर मोठे यश आले असून, अनेक वर्षांपासून बंद आणि नादुरुस्त असलेली मुख्य जलवाहिनी दोन महिन्यांच्या अथक कसरतीनंतर यशस्वीपणे सुरू करण्यात आली आहे. यामुळे पैनगंगा नदीचे पाणी थेट ढाणकी येथील जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचले असून, जीवन प्राधिकरण योजने च्या माध्यमातून ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळण्याचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे.काही दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारलेल्या नवनियुक्त नगराध्य…
ढाणकी प्रतिनिधी -महागाव तालुक्यातील वडद येथील रहिवासी आणि सक्रिय गोरक्षक गजानन सुरोशे यांची गोवंश तस्करांनी निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या थरारक घटनेचे संपूर्ण जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले असून, जनसामान्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या क्रूर हत्येचा जाहीर निषेध करण्यासाठी आणि आरोपींना कठोर शिक्षेच्या मागणीसाठी आज ढाणकी शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गजानन सुरोशे हे गेल्या अनेक दिवसांपासून परिसरात गोवंश रक्षण आणि बेकायदेशीर तस्करी रोखण्यासाठी सक्रियपणे काम करत होते. नेहमीप्रमाणे गोवंशाची बेकायदेशीर…
Social Plugin