ढाणकी नगरपंचायत च्या नगराध्यक्ष सह नगरसेवक पदा करीता दिनांक 2 डिसेंबर रोजी मतदान झाले . उच्च न्यायल्याच्या आदेशा नुसार मत मोजणीची तारीख वाढवण्यात आल्याने मतमोजणी आता दि 21 डिसेंबर रोजी होणार आहे . मतदान झाल्या नंतर मतदान यंत्र धान्य गोडावून येथे तयार केलेल्या मजबूत कक्षात ठेवण्यात आले आहेत. 2 डिसेंबर ते 21 डिसेंबर पर्यत मतदान यंत्र ठेवलेल्या रूमला पोलीस विभागाचा कडा पाहरा असल्याचे दिसत आहे. पोलीस विभागाच्या निगराणीत जरी मतदान असले तरी मतदान यंत्र ठेवलेल्या रूम वर चोवीस तास लक्ष ठेवण्या करीता आम्हाला तिसरा डोळा म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरे बसवून द…
ढाणकी येथील भाजपच्या प्रचार सभेत हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन. आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने ढाणकी येथील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कृषी उत्पन्न बाजार उपसमिती मार्केट येथे भव्य दिव्य सभा संपन्न झाली. भाजपा अल्पसंख्यांक आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष जनाब जमाल सिद्दिकी यावेळी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासमवेत विदर्भ प्रांत प्रमुख भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे रमजान अन्सारी, जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक आघाडी आतीक मौलाना व उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार किसनराव वानखेडे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या अनु…
बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सोईट शेत शिवारात रात्री पोलिसांनी अवैध देशी दारू साठा जप्त करत मोठी कारवाई केली . बिटरगाव पोलिसांकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्याचे धाबे दणाणले असल्याचे दिसून येत आहे. सोमवार दिनांक २४ नोव्हेंबर रोजी रात्री ११/०० वाजताचे दरम्यान बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पांडुरंग शिंदे यांना गोपणीय खबर मिळाली कि ब्राम्हणगाव येथील इसम नामे विपीन माधवराव कोथळकर (३५)वर्षे हा त्याच्या सोईट शेत शिवारातील शेतात अवैध्यरित्या ३५ बॉक्स देशी दारू विकी करण्याच्या उददेशाने बाळगुन आहे. अशा खात्रीशीर माहीत…
महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री संजय राठोड यांनी होऊ घातलेल्या नगरपंचायत च्या निवडणुकी संदर्भात शिवसेनेच्या वतीने उभ्या असलेल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आरती राजू कलाले नगरसेवक पदाचे उमेदवार व नेमलेले पाच प्रतिनिधी व पक्षाचे पदाधिकारी यांना वानखेडे वेअर हाऊस उमरखेड रोड येथे आयोजित केलेल्या आढावा बैठकीत मार्गदर्शन केले. प्रथमता महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले . पालकमंत्री राठोड यांनी ढाणकी नगरपंचायत वर शि…
ढाणकी नगरपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी नगराध्यक्ष पदाच्या एका उमेदवारासह तीन नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज मागे घेतले आहे. यामुळे आता ढाणकी नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत निश्चित झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदाच्या अपक्ष उमेदवार सूर्यांका प्रशांत विनकरे यांनी आपला नामांकन अर्ज मागे घेतला.तसेच, नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक १ मधून जालिंदर विठ्ठलनाथ सुरमवाड, प्रभाग क्रमांक २ मधून शेख इरफान शेख गुलाब आणि प्रभाग क्रमांक ६ मधून सरस्वती दिगंबर खिर…
नगरपंचायत निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याची सोमवारी शेवटची तारीख होती. त्यामुळे उमेदवारांची चांगली तारांबळ उडाली. दुपारी तीन वाजेपर्यंत नमांकन अर्ज स्वीकारले जाणार होते. त्यानंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये नामांकन अर्ज स्वीकारल्या जाणार नाही असे निवडणूक निर्णय अधिकारी राजू सुरडकर यांनी सांगितले. त्यामुळे शेवटच्या दिवशी आपला अर्ज भरण्यात यावा याकरिता उमेदवार घाई करताना दिसून येत होते. अर्ज भरण्यासाठी आपल्या समर्थकांसमवेत वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे उमेदवार शक्ती प्रदर्शन करत नगरपंचायत कडे अर्ज भरण्यासाठी आले होते. शेवटच्या दिवशी पक्षांनी आपल्या …
उमेदवारांना नामनिर्देशन पत्र भरण्याची तारीख ही 17 नोव्हेंबर आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ येत असल्याने उमेदवारांची उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग सुरू झालेली आहे. शासनाने आज सुट्टीच्या दिवशीही अर्ज भरण्याची मुभा दिली असल्याने ढाणकी नगरपंचायत येथे अध्यक्ष व नगरसेवक पदासाठी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी एकच घाई केली. नगराध्यक्ष पदासाठी रविवारी ऑनलाईन सहा अर्ज तर नगरसेवक पदासाठी एकूण 35 अर्ज दाखल झाले. ढाणकी नगरपंचायतच्या निवडणूकी साठी राजकीय पक्ष सज्ज झाल्याचे दिसून येत आहेत तसेच आपल्यालाच पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक उमेदवार …
विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या पैनगंगा अभयारण्यातील सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यास संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच तेलंगना राज्यातून पर्यटक येत असतात. आज दिनांक 13 नोव्हेंबर रोजी सहस्त्रकुंड येथे एकांबा येथील भाविक देव दर्शना करीता नदी पलीकडे गेले होते. जाताना नदी पात्रात पाणी कमी असल्याने त्यांनी नदी पत्रातून पायी जात इस्लापूर तालुक्यातील एका श्रद्धा स्थानाला भेट देऊन परतीच्या वेळी तोच मार्ग निवडला व नदी पात्रातून ते येऊ लागले. नदी पात्राच्या मध्य भागी येताच नदीवर जवळच असलेल्या मुरली डॅम वरून पाणी सोडण्यात आले त्यामुळे कोरडी असलेल्या नदी …
नगरपंचायतची ही आगामी निवडणूक मोठ्या चुरशीची होणार आहे. इच्छुक उमेदवार तयारीला लागले असून आपली उमेदवारी पक्की व्हावी यासाठी पक्षाकडे मागणी करत आहेत. उमेदवाराबाबत राजकीय पक्षांनी सुद्धा मुलाखती घेऊन उमेदवारांची चाचपणी सुरू केलेली आहे. नगरपंचायत निवडणूक लढवू पाहणाऱ्या उमेदवाराची संख्या पाहून काही राजकीय पक्षाने आपल्या पक्षाचा सर्वे चालू केला. यामध्ये त्या दावेदार उमेदवाराची लोकप्रियता तपासली जाणार आहे. सर्वे करते वेळी उमेदवारी मागणाऱ्या सर्व उमेदवाराचे नाव त्या सर्वे फॉर्म मध्ये यायला पाहिजे होते परंतु एका राजकीय पक्षाच्या सर्वे फॉर्म मध्ये न…
युवक मंडळ संचालित स्वामी पेंडसे गुरुजी विद्यालयात आज रोटरी क्लब उमरखेड यांच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांना आकांक्षा’ शैक्षणिक ॲपचे विनामूल्य वितरण करण्यात आले.या कार्यक्रमाला रोटरी क्लब उमरखेडचे अध्यक्ष माननीय श्री. श्रीराम सारडा, सचिव माने साहेब, तसेच या ॲपचे विनामूल्य वितरण करणारे रोटरी क्लबचे सदस्य डॉ. गौस साहेब उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. प्रा. अनिल काळबांडे सर, उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब चंद्र, उमरखेड पंचायत समितीचे माजी सभापती ख्वाजाभाई, डॉ. अबरार, नगरसेवक इरफान भाई, काँग्रेस शहर अध्…
Social Plugin