स्ट्राँग रूमवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा बसवून देण्याची नगरपंचायत प्रशासनाकडे उमेदवारांची मागणी.


ढाणकी नगरपंचायत च्या नगराध्यक्ष सह नगरसेवक पदा करीता दिनांक 2 डिसेंबर रोजी मतदान झाले . उच्च न्यायल्याच्या आदेशा नुसार मत मोजणीची तारीख वाढवण्यात आल्याने मतमोजणी आता दि 21 डिसेंबर रोजी होणार आहे . मतदान झाल्या नंतर मतदान यंत्र धान्य गोडावून येथे तयार केलेल्या मजबूत कक्षात ठेवण्यात आले आहेत.  2 डिसेंबर ते 21 डिसेंबर पर्यत मतदान यंत्र ठेवलेल्या रूमला पोलीस विभागाचा कडा पाहरा असल्याचे दिसत आहे. पोलीस विभागाच्या निगराणीत जरी मतदान असले तरी मतदान यंत्र ठेवलेल्या रूम वर चोवीस तास लक्ष ठेवण्या करीता आम्हाला तिसरा डोळा म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरे बसवून देण्याची मागणी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ. रेखा रमेश गायकवाड, शिवसेना उद्धव ठाकरे गटा चे उमेदवार सौ. अर्चना सुंदरकांता वासमवार, शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ.आरती राजू कलाले यांनी एकत्रितरित्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा तालुका दंडाधिकारी याच्या कडे केली तसेच  सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चित्रकरण दररोज देण्याची सुद्धा मागणी केली आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर होइ पर्यंत मतदान यंत्र सांभाळण्यासाठी प्रशासनाला मात्र तारेवरची कसरत करावी लागणार हे मात्र नक्की आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या