ढाणकी येथील भाजपच्या प्रचार सभेत हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन.
आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने ढाणकी येथील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कृषी उत्पन्न बाजार उपसमिती मार्केट येथे भव्य दिव्य सभा संपन्न झाली. भाजपा अल्पसंख्यांक आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष जनाब जमाल सिद्दिकी यावेळी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासमवेत विदर्भ प्रांत प्रमुख भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे रमजान अन्सारी, जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक आघाडी आतीक मौलाना व उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार किसनराव वानखेडे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या अनुषंगाने मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष पुरी यांनी केले. तर मागील पाच वर्षात केलेल्या कार्याचा लेखाजोखा प्रथम नगराध्यक्ष सुरेश जयस्वाल यांनी मांडला. सदर कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी कडून उभे असलेले सर्व उमेदवार, अल्पसंख्याक आघाडीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी तथा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुस्लिमांनो भाजपकडे वळा, खऱ्या अर्थाने मुस्लिमांचा सर्वांगीण विकास हा भाजपच करत आहे व भाजपच करणार ! असे मत यावेळी जमाल सिद्दिकी यांनी व्यक्त केले.

0 टिप्पण्या