अवैध दारु साठा जप्त . ठाणेदार पांडुरंग शिंदे यांची कारवाई.


बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सोईट शेत शिवारात रात्री पोलिसांनी अवैध देशी दारू साठा जप्त करत मोठी कारवाई केली . बिटरगाव पोलिसांकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्याचे धाबे दणाणले असल्याचे दिसून येत आहे.  सोमवार दिनांक २४ नोव्हेंबर रोजी रात्री ११/०० वाजताचे दरम्यान बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पांडुरंग शिंदे यांना गोपणीय खबर मिळाली कि ब्राम्हणगाव येथील इसम नामे विपीन माधवराव कोथळकर (३५)वर्षे हा त्याच्या सोईट शेत शिवारातील शेतात अवैध्यरित्या ३५ बॉक्स देशी दारू विकी करण्याच्या उददेशाने बाळगुन आहे. अशा खात्रीशीर माहीती वरूण बिटरगाव पोलिसांच्या ताफ्यासह सदर ठिकाणावर छापा टाकला असता आरोपी विपीन माधवराव कोथळकर हा घटनास्थळावरूण पळुन गेला. त्याच्या शेतातील विहीरी जवळ दोन बॉक्स देशी दारू एकुन नग ९५ काचेच्या बॉटल देशी दारू भिंगरी संत्रा प्रत्येकी बॉटल किं.अ.९०रू प्रमाणे एकुन किं.अ. ८५५०/रू. मुदद्देमाल अवैध्यरित्या मिळुन आला हा सर्व अवैध दारू विक्रीचा साठा घटनास्थळावरूण नमुद पंचासमक्ष जप्त करण्यात आला असुन नमुद आरोपी विरूध्द महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम ६५ ई प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कार्यवाही कुमार चिंता पोलीस अधिक्षक यवतमाळ, अप्पर पोलीस अधिक्षक यवतमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड याच्या मार्गदर्शनात सहा. पोलीस निरिक्षक पांडुरंग शिंदे, पोउपनि सागर अन्नमवार पोहवा / संतोष चव्हाण, पोहवा/राहुल कोकरे, पोकों, प्रविण जाधव, पोकों, सुदर्शन जाधव, पोकों, अंबादास गारूळे यांनी केली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या