नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने पालकमंत्री संजय राठोड यांची ढाणकी येथे आढावा बैठक. उमेदवारांना केले मार्गदर्शन.


महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री संजय राठोड यांनी होऊ घातलेल्या नगरपंचायत च्या निवडणुकी संदर्भात शिवसेनेच्या वतीने उभ्या असलेल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आरती राजू कलाले नगरसेवक पदाचे उमेदवार व नेमलेले पाच प्रतिनिधी व पक्षाचे पदाधिकारी यांना  वानखेडे वेअर हाऊस उमरखेड रोड येथे आयोजित केलेल्या आढावा बैठकीत मार्गदर्शन केले. प्रथमता महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून  अभिवादन करण्यात आले .                                                              पालकमंत्री राठोड यांनी  ढाणकी नगरपंचायत वर शिवसेनेचा भगवा फडकवा निधी खेचून आणून शहराचा विकास करून कायापालट करण्याची जबाबदारी माझी असेल असे आवाहन  यावेळी त्यांनी केले. शहरात पाण्याचा गंभीर प्रश्न आहे तो अद्याप निकाली लागलेला नाही. तो प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला मतदारापर्यंत पोहचून त्यांच्या मतदार रुपी आशीर्वादाची अत्यंत आवश्यकता आहे . नगर विकास खाते हॆ आपले लाडके नेते उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांकडे आहे. त्यामुळे ढाणकीच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी त्यांच्याकडून आणून ढाणकी नगरपंचायत च्या विकासासाठी  पुरवने माझी जबाबदारी राहील. त्यामुळे सर्वांनी एकजुटीने कामाला लागा व जनतेपर्यंत पोहचा नगर अध्यक्षपदाचा उमेदवार व नगरसेवक पदाचे उमेदवार निवडून येण्यासाठी ही जबाबदारी नेमलेल्या पाच प्रतिनिधीची राहील. असे आव्हान सुद्धा  पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. त्याचप्रमाणे  शिवसेना किसान मोर्चा तालुका अध्यक्षपदी गोपाल सिंह गौर यांची नियुक्ती झाल्याबद्दल, व दिगांबर शिरडकर यांची ढाणकी शिवसेना संघटक पदी नियुक्त झाल्याबद्दल पालकमंत्री संजय राठोड यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.                            कार्यक्रमाचे अध्यक्ष पालकमंत्री संजय राठोड हे होते तर मंचावर उपस्थित शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख श्रीधर मोहड,जीवनराव पाटील, सलीम भाई खेतानी पांढरकवडा, संतोष जाधव, रुडे, प्रवीण पाटील मिरासे, दत्तदिगंबर वानखेडे उमरखेड महागाव विधानसभा समन्वयक, चितंगरव कदम सर शिवसेना शहरप्रमुख संजय सल्लेवाड, नगरअध्यक्ष पदाच्या उमेदवार आरती राजू कलाले व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल सिंह गौर यांनी केले. तदनंतर ढाणकी शिवसेना कार्यालय येथे धावती भेट दिली त्यात अनेक जणांनी शिवसेनेत प्रवेश केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या