ढाणकी नगरपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी नगराध्यक्ष पदाच्या एका उमेदवारासह तीन नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज मागे घेतले आहे. यामुळे आता ढाणकी नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत निश्चित झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदाच्या अपक्ष उमेदवार सूर्यांका प्रशांत विनकरे यांनी आपला नामांकन अर्ज मागे घेतला.तसेच, नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक १ मधून जालिंदर विठ्ठलनाथ सुरमवाड, प्रभाग क्रमांक २ मधून शेख इरफान शेख गुलाब आणि प्रभाग क्रमांक ६ मधून सरस्वती दिगंबर खिरे यांनीही निवडणुकीतून माघार घेतली आहे. आता नगराध्यक्षपदासाठी चार उमेदवारांमध्ये थेट लढत असून यामध्ये कोण बाजी मारेल ही येणारी वेळच सांगेल. काँग्रेस पक्षा तर्फे रेखा रमेश गायकवाड ,भारतीय जनता पक्ष (भाजप): शिवनंदा रमेश गायकवाड, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) अर्चना सुंदरकांता वासमवार , शिवसेना (शिंदे गट) आरती राजू कलाले, वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार संघमित्रा संतोष गायकवाड, रिपब्लिकन सेना उमेदवार सीमा तानाजी गायकवाड असे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नगराध्यक्षपदाच्या प्रमुख चार उमेदवारांमध्ये आता थेट लढत होणार असल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि लक्षवेधी ठरणार आहे. सदर निवडणुकीत नगरसेवक पदासाठी एकूण 90 उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. तर नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

0 टिप्पण्या