नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवार असलेल्या महिलेचे नाव सर्वे फॉर्म मधून वगळल्याने शहरात चर्चेला उधाण.

नगरपंचायतची ही आगामी निवडणूक मोठ्या चुरशीची होणार आहे. इच्छुक उमेदवार तयारीला लागले असून आपली उमेदवारी पक्की व्हावी यासाठी पक्षाकडे मागणी करत आहेत. उमेदवाराबाबत राजकीय पक्षांनी सुद्धा मुलाखती घेऊन उमेदवारांची चाचपणी सुरू केलेली आहे.नगरपंचायत निवडणूक लढवू पाहणाऱ्या उमेदवाराची संख्या पाहून काही राजकीय पक्षाने आपल्या पक्षाचा सर्वे चालू केला. यामध्ये त्या दावेदार उमेदवाराची लोकप्रियता तपासली जाणार आहे. सर्वे करते वेळी उमेदवारी मागणाऱ्या सर्व उमेदवाराचे नाव त्या सर्वे फॉर्म मध्ये यायला पाहिजे होते परंतु एका राजकीय पक्षाच्या सर्वे फॉर्म मध्ये नगराध्यक्ष पदाची उमेदवारी पक्षा कडे मागूनही त्या उमेदवारचे नाव सर्वे फॉर्म मध्ये नसल्याने शहरात वेगळ्या चर्चेला उधाण आलेले आहे. सर्वे करणाऱ्या एजन्सी कडून एका महिला इच्छुक उमेदवाराचे नाव सर्वे फॉर्म मध्ये आले नसल्याने सर्वे त्वरित थांबविण्याची मागणी तालुक्याच्या नेत्या कडे त्यांनी केली आहे. नगरपंचायत अध्यक्ष पदाचे आरक्षण हे अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी सुटलेले आहे. सर्वे मध्ये नाव विसरलेल्या महिले ची उमेदवारी सर्वात जास्त चर्चेत असते वेळी त्या महिला उमेदवार हिचे नाव सर्वे फॉर्म मधून वगळल्याने मतदार आश्चर्य व्यक्त करत आहेत. त्या इच्छुक महिला उमेदवाराने 5 वर्ष ढाणकी गावचे सरपंच म्हणून कार्यभार यशस्वीपने सांभाळला आहे तर त्यांच्या पतीने जिल्हा परिषद सदस्य होण्याचा मान मिळवलेला आहे. दोघांनाही राजकारणाचा तगडा अनुभव असताना सर्वे करणाऱ्या एजन्सीने त्यांचे नाव डावळल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. निवडणूक काळामध्ये राजकीय भूकंप तर होतच राहतात. मात्र एखाद्या प्रमुख दावेदार उमेदवाराचे नाव जर वगळल्या जात असेल तर यात काही राजकारण तर नाही ना. अशी चर्चा नागरिक करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या