सहस्त्रकुंड धबधबा ओलांडून येत असते वेळी पाच प्रवासी नदी पात्रात अडकले . प्रशासनाने वेळीच मदत केल्याने वाचले त्यांचे प्राण.


विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या पैनगंगा अभयारण्यातील सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यास संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच तेलंगना राज्यातून पर्यटक येत असतात. आज दिनांक 13 नोव्हेंबर रोजी सहस्त्रकुंड येथे एकांबा येथील भाविक देव दर्शना करीता नदी पलीकडे गेले होते. जाताना नदी पात्रात पाणी कमी असल्याने त्यांनी नदी पत्रातून पायी जात इस्लापूर तालुक्यातील एका श्रद्धा स्थानाला भेट देऊन परतीच्या वेळी तोच मार्ग निवडला व नदी पात्रातून ते येऊ लागले. 
नदी पात्राच्या मध्य भागी येताच नदीवर जवळच असलेल्या मुरली डॅम वरून पाणी सोडण्यात आले त्यामुळे कोरडी असलेल्या नदी मध्ये पाण्याचा प्रवाह वाढला . व नदीपात्रातून येणारे प्रवासी मधोमध अडकले. त्यामध्ये अनुसया दिगंबर तालमवाड, पूजा दिगंबर तालमवाड , गजराबाई शिवाजी काटेवाड, सुवर्णा ज्योतीराम गांधारवाड विनायक ज्योतीराम गांधारवाड, कामिनी ज्योतीराम गांधारवाड वय वर्ष 5 , कोमल शिवाजी काटेवाड, हे मदतीसाठी आवाज देऊ लागले. धबधबा पाहण्यास आलेल्या इतर पर्यटकानी आवाजाच्या दिशेने जात पाहणी केली असता त्यांना नदी पात्रात धबधब्याच्या मधोमध तीन महिला एक पुरुष एक चिमुरडी मुलगी दिसली. त्यांनी त्वरित विश्राम गृहच्या कर्मचाऱ्याला माहिती दिली. विश्रामगृहाच्या कर्मचाऱ्याने त्वरित बिटरगाव पोलीस स्टेशन ठाणेदार पांडुरंग शिंदे यांना घटनेची माहिती दिली. ठाणेदार पांडुरंग शिंदे यांनी त उपविभागीय अधिकारी सखाराम मूळे, तहसीलदार राजेश सुरडकर यांना कल्पना दिली. नदी पत्रात असलेल्या मुरली बंधरा येथून पाणी सोडण्यात आले ते पाणी त्वरित बंद करण्याचा सूचना बंधारा कर्मचाऱ्याला दिल्या. कर्मचाऱ्याने त्वरित नदी वरील गेट बंद करून पाणी पुरवठा थांबवीला. स्थानिक मच्छिमार यांना पाचरण करून नदी पत्रात अडकलेल्या प्रवास्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सदर बचाव कार्य नांदेड जिल्हा प्रशासन, बिटरगाव पोलीस स्टेशन, व यवतमाळ जिल्हा प्रशासनाच्या वतीने पार पाडण्यात आले.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या