युवक मंडळ संचालित स्वामी पेंडसे गुरुजी विद्यालयात आज रोटरी क्लब उमरखेड यांच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांना आकांक्षा’ शैक्षणिक ॲपचे विनामूल्य वितरण करण्यात आले.या कार्यक्रमाला रोटरी क्लब उमरखेडचे अध्यक्ष माननीय श्री. श्रीराम सारडा, सचिव माने साहेब, तसेच या ॲपचे विनामूल्य वितरण करणारे रोटरी क्लबचे सदस्य डॉ. गौस साहेब उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. प्रा. अनिल काळबांडे सर, उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब चंद्र, उमरखेड पंचायत समितीचे माजी सभापती ख्वाजाभाई, डॉ. अबरार, नगरसेवक इरफान भाई, काँग्रेस शहर अध्यक्ष अमोल तुपेकर, गजानन मिटकरे, पत्रकार गजानन गांजेवाड, ब्रह्मानंद मुनेश्वर, तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेश जयस्वाल ,कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेश जयस्वाल यांनी केले.यानंतर प्रमुख अतिथी डॉ. प्रा. अनिल काळबांडे सरांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. डॉ. गौस साहेबांनी ‘आकांक्षा’ ॲपचे शैक्षणिक महत्व आणि विद्यार्थ्यांसाठी त्याचे उपयुक्त फायदे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विजय पराते सरांनी तर आभार प्रदर्शन श्री. काईट सरांनी केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्यास मोठी मदत होणार आहे.

0 टिप्पण्या