ढाणकी प्रतिनिधी –
सामाजिक कार्यात नेहेमी अग्रेसर असणाऱ्या इंटरनॅशनल आयकॉन पुरस्कार प्राप्त संस्था जिव्हाळा संस्था ही नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम घेऊन समाजसेवेत पुढे असते. संस्थे चा अनोखा उपक्रम “स्वागत स्त्री जन्माचे” (लेक वाचवा, लेक वाढवा, लेक शिकवा ) हा उपक्रम सुद्धा खूप प्रेरणादायी आहे या उपक्रमा मध्ये संस्थे ने आता पर्यंत 771 कन्यारर्त्नांचे स्वागत करून समाजामध्ये एक प्रेरणादायी संदेश दिला आहे आणि देत आहे. याच उपक्रमच्या धरतीवर आज संस्थे ने अनाथ बालकांना दत्तक फार मोठा विडा उचलेलाआहे , मागील 9 वर्षा पासून महिला सक्षमीकरण, महिला व बालविकास, आरोग्य, शिक्षण, उपजीविका, जैवविविधता, कृषी, ग्रामविकास, याला प्राधान्य देत संस्था यशा कडे वाटचाल चालू आहे.
संस्थे मार्फत 2 ऑक्टोबर गांधी जयंतीचे औचित्य साधून जिव्हाळा संस्थेचे दैवत जलतज्ज्ञ, पाणीदार माणूस स्व. मधुकरजी धस यांच्या प्रेरणेने जिव्हाळा बहु. संस्थेने करंजी येथील कु. आरती संतोष धामणे या मुलीचा वयाच्या 18 व्या वर्षा पर्यंत शैक्षणिक खर्चाबद्दल पालकत्व स्वीकारले आहे. आरतीचे लहानपणीच आई वडिलांचे छत्र हरवलेले असून तिचा सांभाळ म्हातारे आजी आजोबा करत आहे. मुलीला वाढवताना तसेच शैक्षणिक खर्च करताना आजी आजोबांची प्रचंड ओढाताण होत होती. तेव्हा ही बाब लक्षात घेऊन जिव्हाळा संस्थेचे अध्यक्ष अतुल मादावार यांनी करंजी गाव गाठून कुटुंबाची भेट घेतली व दत्तक घेण्याची मनिषा बोलून दाखवली आणि लगेच दत्तकपत्र देऊन आज पासून शैक्षणिक खर्च उचलला. यावेळी छोट्या आरतीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्या सारखा होता. व मोठे होऊन अधिकारी बनण्याचे स्वप्न असल्याचे आरतीने सांगितले. या वेळी गावातील जेष्ठ माधवराव कलाणे पाटील, संस्थे चे अध्यक्ष अतुल मादावार जिव्हाळा संस्थे चे सल्लागार कृष्णाजी वासमवार, प्रेस पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अनिल राठोड, पत्रकार मोहन कळमकर, कैलास घुगरे, व गौतम घुगरे , प्रशांत शिनकरे, कचरू कांबळे, प्रकाश घुगरे, सुमेध घुगरे हे उपस्थित होते संस्थेच्या या उपक्रमाचे करंजीमध्ये व परिसरात कौतुक होत आहे.

1 टिप्पण्या
Khup chan .....
उत्तर द्याहटवा