रद्द झालेल्या स्वस्त धान्य दुकानाचा जाहीरनामा काढण्याची केली मागणी.



संग्रहित चित्र 


निंगणूर प्रतिनिधी:-मारोती गव्हाळे

उमरखेड तालुका अंतर्गत येत असलेल्या निंगणूर  या अतिदुर्गम भागातील  स्वस्त धान्य दुकानदार यांचा परवाना रद्द झाला असून,आंदाजे तीन ते चार महिने पूर्ण झाले आहे.त्या दुकानाचा जाहीरनामा अद्याप निघालेला नाही.तात्पुरत्या स्वरुपात इसापूर येथील स्वस्त धान्य दुकानदार यांना ते दुकान जोडलेले आहे.परंतु गावचा व्याप हा फार मोठा असून,येथील क्षेत्रफळ सुद्धा फार मोठे आहे.येथे,अनंतवाडी,महादेवाडी, हिरामनगर, चिंचवाडी, संतोषवाडी, शंकरवाडी,टारपेवाडी, नागेशवाडी. गोकुळवाडी इत्यादी अनेक वस्त्या येत असून,त्या वस्त्यातील जनतेला स्वस्त धान्य दुकानातून माल आणण्यास नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे येथील स्थानिक लोकांना प्राधान्य देण्यात यावे.व  स्वस्त धान्य दुकानदार यांचा परवाना रद्द झाल्यामुळे  निंगणूर  येथील स्वस्त धान्य दुकानाचा जाहीरनामा काढून योग्य त्या स्वस्त  धान्य दुकानदाराची नेमणूक करण्यात यावी. अशी मागणी  निंगणूर  येथील ग्रामस्थां मार्फत  होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या