उमरखेड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा. शेतकऱ्यांची निवेदना द्वारे मागणी.

 


सावळेश्वर प्रतिनिधी -मारोतराव रावते 

सततच्या होणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यामुळे  उमरखेड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सावळेश्वर,  करंजी येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार उमरखेड यांना निवेदना द्वारे केली आहे. 

या वर्षी निसर्गाचे घात शेतकऱ्यांवर वारंवार  होत असून य मुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.  उभ्या सोयाबीन मध्ये पावसाचे तळे साचले असून,  शेंगा मधून कोंब बाहेर . अश्या परिस्थिती मध्ये आता जगावे कसे?  हाता तोंडाशी आलेला घास जाण्या ची शक्यता निर्माण झाली आहे. 


वारंवार अर्ज,  निवेदन देऊन दिल्या नंतर शासनाने बाधित जमिनीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले.  मात्र फक्त पंचनामे न करता प्रशासनाने सरसकट ओला दुष्काळ घोषित करून विमा रक्कम द्यावी अशी शेतकरी संघटनांची मागणी आहे. 

याबाबत आज परिरसतील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तहसीलदार यांना निवेदनातून वरील मागण्या केल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या