बिटारगाव प्रतिनिधी
कमलाकर दुलेवाड.
तलाठी हा ग्राम स्थरावरचा महत्वाचा घटक असतो. शेतकऱ्यांचे आणि तलाठी यांचे तर रोजचा संबंध असतो. तलाठी नी मुख्यालयी राहणे गरजेचे असताना मात्र बिटरगाव येथील तलाठी आपल्या मुख्यालयी हजर राहत नसल्याने मात्र शेतकरी तसेच गावकर्यांना मोठा त्रास होत असून तलाठ्यांनी मुख्यालयी हजर राहावे म्हणून जितेंद्र आव्हाड युवा मंच च्या वतीने निवेदन देण्यात आले असून तलाठी वर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. शेतकऱ्यांना विविध कामा साठी उमरखेड ला जावे लागतं असून उमरखेड ला सद्या च्या स्थिती मध्ये भरपूर कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे ये जा केल्याने त्या

शेतकऱ्यांना सुद्धा कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तातडीने तहसीलदार साहेबांनी तलाठी यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश द्यावे अशी मागणी जितेंद्र आव्हाड युवा मंच चे प्रदेश सचिव अमितकुमार कांबळे यांनी निवेदनात केली आहे.

0 टिप्पण्या