ढाणकी प्रतिनीधी (गोपाल गौरवाड )
कोरोनाच्या संकटामुळे मजूर आणि निराधार अडचणीत सापडले आहे त्यांना भाजपतर्फे घरपोच अन्नधान्याचे वाटप केले जात आहे. कोरोनामुळे संचारबंदी व लॉक डाऊन लागू करण्यात आली यामुळे सर्व कामे ठच्प पडली परिणामी मजूर व अनेक निराधांवर उपासमाराची वेळ आली या कुटुंबांना मदत म्हणून आमदार नामदेव ससाणे साहेब, महेश कलेश्वरकर ,नगरअध्यक्ष सुरेश जयस्वाल, भाजपा शहर अध्यक्ष रोहित वर्मा, महेश पिंपरवार,भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष नागेश रातोळे,विष्णूदास वर्मा, पांडे डॉक्टर, शकंर काळकर,मनोज राहूलवाड, नागेश महाजन,विशाल इंगळे, राजु शिवाल यांनी ढानकी शहरातील निराधारांना घरपोच अन्नधान्याचे वाटप करण्यात आले
भारत हा कृषी प्रधान देश आहे. त्यामुळे भारतातील साठ टक्के जनता ही ग्रामिण भागात राहते. ग्रामीण भागाची अर्थव्यवस्थाच मुळात शेतीवर अवलंबुन आहे. शेतीवर उपजिवीका करणा-या शेमजुरांना आज त्या कोरोणा या विशाणुमुळे हाताला कोणतेही काम नाही आहे. आज उभ्या टाकलेल्या संकटावर मात करावी या करीता सरकारने संचार बंदी लागु केली. त्यामुळे मजुरांवर उपासमारी ची वेळ आली आहे. शहर भाजपने आपण समाजाचे काही देणे लागतो आज गोर गरीब मजुरावर आर्थिक संकट कोसळले त्यांना आपल्याला काही तरी देणे लागते म्हणुन आपल्याकडुन जेवढी जमेल तेवढी मदत आणुन देण्याचे आवाहण केले होते.
त्याला प्रतिसाद देत गावातील जनतेने जमेल तेवढी मदत दिली त्यामध्ये जमलेल्या निधीतुन गोर गरीब निराधार मजुरांकरीता अन्नधान्य, किराणा, तेल साबण या सह जिवणाष्यक वस्तु ची वाटप आज पासुन जो संचारबंदी लागु आहे तो पर्यंत गरजुंना मदत करण्यात येईल असे नगरअध्यक्ष सुरेष जयस्वाल, भाजपा तालुका अध्यक्ष सुदर्शन रावते, भाजपा शहरअध्यक्ष रोहीत वर्मा नगरपंचायत गटनेते संतोशपुरी यांनी केले व वाटपाला सुरवात केली.
त्यांनी उचललेल्या या सामाजीक कामा मुळे आर्थीक संकटात सापडलेल्या लोकांना मदतीचा हात पुढे केल्यामुळे त्यांचे कार्याचा गावगवा ढाणकीत केल्या जात आहे. अषाच मदतीची गरज आज गावखेडयात राहणा-या मजुरांना मिळणार का? कोणी दाता गाव खेडयातील आर्थिकदृश्टया खचलेल्यांना मदत करण्यास पुढे येईल का असा प्रष्न गावखेडयातील कोरोणामुळे आर्थिकदृश्टया संकटात सापडलेल्या मजुरांना पडला आहे.
भाजपाच्या धान्य वाटपाच्या कार्यक्रमाचे ढाणकीमध्ये कौतुक होत आहे.


2 टिप्पण्या
यावेळी तरी पक्ष प्रचार करू नका खरेच जर जन सेवा ही ईश्वर सेवा समजत असाल तर फोटो काडून गरबांची मजाक करू नका RN
उत्तर द्याहटवायावेळी तरी पक्ष प्रचार करू नका खरेच जर जन सेवा ही ईश्वर सेवा समजत असाल तर फोटो काडून गरबांची मजाक करू नका RN
उत्तर द्याहटवा