बिटरगाव प्रतिनिधी (कमलाकर दुलेवाड )
अतिशय दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैनगंगा अभयारण्य मध्ये येत असलेल्या सोनदाभी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येत असलेल्या पाच उपकेंद्र मधील सोळा गावा मध्ये येथील वैद्यकीय अधिकारी डॉ कु चंदा पेंडलवार, डॉ एस बी हांडे, आरोग्य सेविका एस बी गुट्टे, श्रीमती जे आर हेंडवे, कु जीवतोडे, वाहनचालक बाळू कत्तलवाड हे ह्या भागातील अति दुर्गम भागात जाऊन कोरोना विषयी जनजागृती करत आहेत.
प्रत्येक गावा मध्ये जाऊन ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य सेविका, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने गावा मध्ये स्वछता मोहीम, आरोग्य ची काळजी घेणे, आवश्यकते नुसार सर्वे करण्याचे काम हे कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र करत आहेत.
या मध्ये प्रा. आरोग्य केंद्र सोनदाभी अंतर्गत पुणे, औरंगाबाद, नागपूर, आदिलाबाद व इतर राज्यातून व बाहेरगावी वरून आलेल्या व्यक्तीची ग्रामस्थां कडून सर्वे करून त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या मध्ये 450 व्यक्तींचा समावेश होता. व त्यांची प्रकृती चांगली असल्याचे समजले.
सोनदाभी केंद्रा अंतर्गत येत असलेल्या सोळा गावाची लोकसंख्या 20751 असून केंद्रा मध्ये फक्त पाच कर्मचारी आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण येत आहे. एकूण मंजूर पदे 21 असून 16 पदे रिक्त आहेत तरी सुद्धा सेवा पुरवण्यासाठी अधिकारी व कर्मचारी जीवाचे रान करत असल्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.

0 टिप्पण्या