अकोली प्रतिनिधी (अनिल राठोड )
कोरोना विषाणूने संपूर्ण जगात धुमाकूळ घालत दहशत पसरवली आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्व यंत्रणा युद्धस्तरावर प्रयत्न करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून उमरखेड तालुक्यातील आकोली येथे मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक
शिवप्रसाद रामप्रसाद येळकर यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान (एमव्हीएसटीएफ) ग्राम कोश निधीमधून ग्रामपंचायतीने जंतुनाशक फवारणी मशीन खरेदी करून गावामध्य जंतुनाशक औषधाची फवारणी केली.
औषध फवारणी करिता उपसरपंच बाबुराव वाघमारे, संजय दवणे, नितीन कदम, विठ्ठल सोळंके, सुनील राठोड यांनी परिश्रम घेतले.
कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता गावात ठीक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी व गावात कोरोना या भायनक महामारी पासून बचाव करण्यासाठी म्हणून, जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार रुपेश खंडारे यांच्या सूचनेनुसार कोरोना प्रतिबंधक समिती स्थापन करण्यात आली असून समितीमध्ये तलाठी , ग्रामसेवक, आरोग्य सेविका, आशा सेविका, कृषी सहाय्यक, पोलीस पाटील यांचा समावेश असून, या समितीचे अध्यक्ष तलाठी आहेत. सदर स्थानिक समितीमार्फत नायब तहसीलदार सुभाष पाईकराव यांच्या उपस्थितीमध्ये आकोली गावामध्ये आणि तांड्यावर घरोघरी जाऊन कोरोना संसर्गजन्य आजाराविषयी जनजागृती करण्यात आली.
यामध्ये पुणे, मुंबई वरून आलेल्या नागरिकांना तपासणी करून घेण्याचा सल्ला देण्यात आला. संचार बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी नागरिकांना विस्तृतपणे मार्गदर्शन करण्यात आले. कोरोना आजार टाळण्यासाठी वारंवार हात स्वच्छ धुणे, खर्रा तंबाखूचे सेवन टाळणे, दारू न पिणे, सामाजिक दुरी जपण्यासाठी किराणा दुकानदारांना मार्किंग आखून दिल्या, शेतामध्ये काम करत असताना एकमेकांमध्ये अंतर ठेवून काम करण्याचा सल्ला नायब तहसीलदार पाईकराव यांनी शेतकऱ्यांना दिला. ट्रॉली स्पीकरच्या माध्यमातून तहसीलदार पारनेर यांची ध्वनिफीत कोरोना जनजागृतीसाठी ग्रामस्थांना ऐकवण्यात आली. तसेच आदर्श गाव आकोली व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ग्रामपरिवर्तक येळकर व तलाठी सुरोशे व स्थानिक प्रशासन वेळोवेळी जनजागृतीचे व्हिडिओ व प्रसिद्धीपत्रके ग्रामस्थांपर्यंत पोहोचवत आहेत. बाहेरून आलेल्या नागरिकांसाठी जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाइन वार्ड तयार करण्यात आला आहे.
जनजागृती करिता नायब तहसीलदार सुभाष पाईकराव, तलाठी गजानन सुरोशे, ग्रामसेवक एफ. एल. शेख, शाव्यस अध्यक्ष दिगंबर देवसरकर, आरोग्य सेविका जोत्स्ना हेंडवे, पोलीस पाटील पंडित धात्रक, कोतवाल कल्याण सोळंके, संगणक परिचालक अमोल जामकर, वनिता हनवते, सुनिता वाघमारे, विमल वाघमारे, रंजना हनवते, लता वाघमारे, मिराबाई राठोड यांनी परिश्रम घेतले.

0 टिप्पण्या