ढाणकी प्रतिनिधी
कोरोना मुळे आज सर्व जगाची आर्थिक स्थिती कोलमडली असताना आज ग्रामीण भागातील गहू, चणा काढणीसाठी मात्र शेतकऱ्यांना जास्त पैसे देऊन काम करून घ्यावे लागत आहे.
सविस्तर वृत्त असे कि, ढाणकी व परिसरातील शेतकऱ्यांचे गहू आणि चन्या चे पीक अजूनही शेतात उभे असताना हार्वेस्टर वाल्या कडून जास्त पैसे ची मागणी होत असल्याने बळीराजा हतबल झाला आहे. आधीच कोरोना मुळे देशात लॉक डाऊन घोषित केले असल्यामुळे सर्व कामे ठप्प आहेत त्यात निसर्गाचा प्रकोपा मुळे हाता तोंडा ला आलेला घास पडण्याच्या स्थिस्तीत आहे. अश्या या संकट कालीन स्थिती चा गैरफायदा काही लोक घेत असून शेतकऱ्यांचे या मुळे मोठे नुकसान होत आहे.
सदर हार्वेस्टर चे मालक हे परप्रांतीय असतात. त्यामुळे ते आपल्या भागातील काही व्यक्तींना एजंट म्हणून नेमून ग्राहक ओढण्याचा प्रयत्न करतात. व प्रत्येक ग्राहकामागे एजंट लोकांना ते भरपूर कमिशन देत असतात. त्यामुळं भरपूर कमिशन च्या हवासापायी एजंट हे शेतकऱ्यांची पीळवनुक करत आहेत.
कोरोना येण्याच्या आधी गहू, चणा काढ नीचा दर हा 1600 रु एकर असा होता मात्र कोरोनाच्या भीती मुळे बरेच हार्वेस्टर मालक आपले वाहन घेऊन आपल्या राज्यात वापस गेल्याने जे राहिले ते आता एकरी 2200 ते 2500 रु काढणीचा दर आकारत असल्याने अश्या बंदच्या स्थितीत करायचे काय आणि खायचे काय अशी स्थिती झाली आहे. तरी या स्थिती वर स्थानिक प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे असून पीळवनुक करणाऱ्यावर योग्य ते कारवाई करावी अशी मागणी स्थानिक शेतकरी करत आहेत.

0 टिप्पण्या