बिटरगांव प्रतिनिधी (कमलाकर दुलेवाड )
कोरोना व्हायरस मुळे संपूर्ण भारतात तसेच महाराष्ट्र मध्ये कलम 144 व संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
लॉकडाऊन च्या काळात जर कोणीही नियमा चे उल्लंघन केल्यास कडक कारवाई केली जाईल असे बिटरगांव पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय चव्हाण यांनी सांगितले.
बिटरगाव पोलीस स्टेशनं अंतर्गत येत असलेल्या चालीस गावाची जबाबदारी तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्या साठी पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, स्वतः च्या जीवाची बाजी लावून कोरोना महामारी विरोधी लढाई लढत आहेत. बंद दरम्यान काही लोक पोलीस निघून गेल्यानंतर घरा बाहेर निघत आहेत आणि आले असता पुन्हा घरात पळत आहेत मात्र ते पोलिसांना फसवत नसून स्वतः ला फसवत असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वतः च्या कुटुंबाला सुख दुःखाची विचारांना न करता अहोरात्र दिनरात एक करून मनात देश भक्ती आणि जनसेवेचे व्रत हाती घेऊन ग्रामीण भागातील नागरिकांना बिटरगाव पोलीस स्टेशनं चे ठाणेदार व सर्व कर्मचारी आपल्या कर्तव्यावर असून यांनी सर्व जनतेला आवाहन केले कि "तुम्ही फक्त घरात राहा, बाहेर पडू नका, गर्दी करू नका, जर हा विषाणू चा प्रादुर्भाव गाव खेड्यात पसरला तर गाव उध्वस्त होतील, त्यासाठी घरी राहा सुरक्षित राहा ". जर एवढे करूनही लोक घराबाहेर पडलेत तर त्यांच्या वर कडक कारवाई केली जाईल असे ठाणेदार विजय चव्हाण यांनी सांगितले.

0 टिप्पण्या