उद्घाटना अभावी रखडलेल्या दवाखान्याचा नगरपंचायतीने घेतला ताबा. नागरीकांना मिळाला दिलासा


.
ढाणकी प्रतिनीधी-
कोरणा या जिवघेण्या विशाणुचा धसका संपुर्ण जगाने घेतला त्याचाच भाग म्हणुन भारताचे प्रधामंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व भारतभर संचारबंदी लागु केली. या महाभयंकर उद्भवलेल्या संकटावर मात करण्याकरीता एकमेव पर्याय असलेल्या एकमेकास स्पर्श न होणे हाच आहे. ढाणकी षहरामधुन रोजी रोटी मिळण्याकरीता इतर षहरामध्ये मिळेल त्या ठिकाणी काम करावयास गेलेल्या नागरीकांना षहरामध्ये आले असताना त्यांच्या पासुन इतर नागरीकांच्या आरोग्यास कोणताही धोका पोहचावा नाही या करीता ढाणकी नगरपंचायतीचे उपनगरअध्यक्ष शेख जहिर शेख मौला, नगरपंचायत सभापती संबोधी गायकवाड, नगरसेवक षेख इरफान, महिला व बालकल्यान सभापती सौ ज्योती ओमाराव चंद्रे,नगरसेवक  रमेश पराते,  संभाजी गोरटकर यांनी ढाणकी मध्ये संपुर्ण बांधकाम करून तयार झालेली दवाखान्याची इमारत बाहेर गावावरून आलेल्या व संक्षयीत असलेल्या नागरीकांना कोणालाही त्यांचा स्पर्श होणार नाही याची काळजी म्हणुन आज सकाळी अकरा वाजता दवाखान्याला भेट देवुन दवाखाना तत्काळ उघडुन बाहेरगावावरून आलेल्या नागरीकांची राहण्याची सोय या ठिकाणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगीतले.
ढाणकी  मधून  कामानिमीत्त व शिक्षणानिमीत्त बाहेर गावी गेलेल्या नागरीकांना षहरबंदी करावी या करीता नगरपंचायतीकडे षहरातील अनेक नागरीकांनी मागणी केली मात्र ढाणकी षहरामध्ये अषीच एक  उदघाटना अभावी रखडलेली दवाखान्याची ईमारत असल्याचे नागरीकांनी लक्षात आणुन देताच त्वरीत नगरपंचायत ने दवाखाना गाठुन बाहेरगावावरून आलेल्या नागरीकांसाठी राहण्याची सेाय म्हणुन ईमारतीचा ताबा घेतला.
आज पर्यंत ढाणकी येथील प्राथमीक आरोग्य केंद्रामध्ये बाहेरगावावरून आलेल्या आपल्या कोरोणा या जिवघेण्या संसर्गाची लागण झाल का? या विषयी  तपासणी करीता 905 जणांनी प्राथमीक उपाचार घेवुन नोंदणी केली असल्याचे ढाणकी येथील प्रा. आ केंद्राचे डाॅ.धनवे यांनी सांगीतले.



ढाणकी मध्ये वाढत्या संशियता च्या संख्या लक्षात घेता,  आणि प्राथमिक आरोग्य केंद्रा मधील अपुऱ्या जागेमुळे होणाऱ्या हेळसांडीमुळे आम्ही नव्या इमारतीच्या ताबा घेत असल्याचे उपनगर अध्यक्ष जहीर भाई यांनी सांगितले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या