ढाणकी नगरपंचायतच्या विषय समित्यांवर सभापती निवड

.


ढाणकी प्रतिनीधी-
ढाणकी नगर पंचायत निवडणुकीत कोण्या एका पक्षाला स्पष्ट  बहुमत मिळाले नसल्यामुळे सत्ता हस्तगत करण्यासाठी भाजपा व काॅंग्रेस पक्षाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. सर्वच पक्षाला ढाणकी नगरपंचायतच्या निवडणुकीत संमिश्र प्रतिसाद मिळाल्यामुळे सत्तेची चाबी एक हाती राहीली नाही. भाजपा कडे अध्यक्षपद तर काॅंग्रेस व मित्रपक्षाकडे उपाध्यक्षपदासह पाच विषय समित्यंावर वंचित व अपक्षाच्या मदतीने विषय  समित्यांवर ताबा मिळवीत ढाणकी नगरपंचायत वर वर्चस्व सिध्द केले.
आज नगरपंचायतच्या विषय  समितीच्या आणि स्थायी समितीच्या व सर्व विषय  समितीच्या सभापती पदासाठी निवडणुक कार्यक्रम घेण्यात आला. नगरपंचायतची विशेष सभा सकाळी अकरा वाजता नगरपंचायत सभागृहात भरवण्यात आली. मा.जिल्हाधिकारी यांच्या आदेषाने अध्यासी अधिकारी म्हणुन उपविभागीय अधिकारी स्वप्निल कापडनिस यांनी काम पाहिले. 
ढाणकी नगरपंचायतच्या निर्वाचित सदस्यांची संख्या अठरा असुन नामनिर्देषित सदस्यांची संख्या दोन आहे. परंतु एक नामनिर्देषित सदस्य गैरहजर होते. काॅंग्रेस 6, वंचित 2, राश्ट्वादी 1, अपक्ष 1, मिळुन वंचित बहुजन आघाडीची सदस्य संख्या दहा, भाजपा पाच, षिवसेना 2, अपक्ष 1, असे पक्षिय बलाबल असुन बहुमताची जादुची छडी महाविकास आघाडीकडे असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम समितीवर सभापतीपदी अपक्ष सोनम नितीनसिंह बैस,  स्वच्छता, वैद्यक, आणि सार्वजनिक आरोग्य सभापती वंचितच्या बषनुरबी सयद खलील, पाणी पुरवठा व जलनिस्सारण सभापती वंचितचे संबोधी महेंद्र गायकवाड, नियोजन आणि विकास सभापती काॅंग्रेसचे षेख जहिर षेख मौला, महिला व बालकल्याण सभापती ज्योती ओमाराव चंद्रे यांची वरिल समितीच्या सभापती पदी बिनविरोध निवडणुन आल्याची घोशणा अध्यासी अधिकारी स्वप्निल कापडणीस यांनी केली आहे. तसेच महिला व बालविकास समितीच्या उपसभापती पदी षेवंता रामा गायकवाड यांची सुध्दा बिनविरोध निवड झाल्याची घोशणा केली.
सत्ता स्थापनेच्या सारीपाटात अनेकांनी आपली प्रतिश्ठा पणाला लावल्याचे दिसुन आले मात्र पुन्हा एकदा काॅंग्रेसचे कृशी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेब चंद्रे पाटील आपले राजकीय कौषल्य दाखवत वंचित चे युवानेते जाॅन्टी विनकरे, जिल्हाअध्यक्ष उत्तम पांडे, राश्ट्वादीचे राजु जयस्वाल, शंकर तालंगकर आणि अपक्ष म्हणुन सोनम नितीनसिंह बैस यांची वज्रमुठ आवळुन ढाणकी नगरपंचायत काबिज केली.

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या