अकोली प्रतिनिधी
(शिवप्रसाद येळकर )
मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी, भाषेच्या संवर्धनासाठी व भाषेचा सार्वत्रिक वापर होण्यासाठी राज्यभर प्रतिवर्षी दिनांक १ जानेवारी ते १५ जानेवारी हा कालावधी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय क्रमांक मभापं-२०१५/प्र.क्र.७०/भाषा-२, दिनांक २२ जुलै, २०१५ घेतला आहे.
त्यानुसार महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानचे नोडल अधिकारी शिवप्रसाद रामप्रसाद येळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आकोली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उपक्रमामध्ये शाळेचे मुख्याध्यापक आनंद पोपुलवाड यांनी मराठी भाषेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक येळकर यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांकरिता सुंदर हस्ताक्षर, निबंध स्पर्धा, मराठी म्हणींची प्रश्नमंजुषा, मराठी भाषा विषयावर सामान्य ज्ञान स्पर्धापरीक्षा आयोजित करण्यात आल्या.
परीक्षेकरिता शाळेतील अमोल मोरे, देवानंद काळे, नागेश मिराशे, वंदना येरावार या शिक्षकांनी बहुपर्यायी तीस प्रश्नांची प्रश्नावली तयार करून तिसरी ते सातवी वर्गातील ४८ विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली. मराठी म्हणींची प्रश्नमंजुषा व सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेमध्ये तिसऱ्या वर्गातील क्षितिज मिराशे, श्रावणी कांबळे, पायल गाडेकर, चौथ्या वर्गातील विजय वाघमारे, मोनिका कदम, विनायक पवार, पाचव्या वर्गातील निकिता गाडेकर, शिवम पवार, गणेश सूर्यवंशी, सहाव्या वर्गातील पायल वाघमारे, शिवानी मिराशे, सुप्रिया मिराशे, सातव्या वर्गातील सुरज वानखेडे, अंजली गाडेकर, वैष्णवी गाडेकर,तसेच घोषवाक्य स्पर्धेमध्ये सुरज वानखेडे आणि निबंध स्पर्धेमध्ये पूनम जाधव यांनी विशेष प्राविण्य मिळवले. गुणवंत विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप म्हणून ग्रामपंचायत कार्यालयाने आणि सरपंच संगीताताई प्रवीण मिराशे यांनी विशेष पुढाकार घेत एमव्हीएसएफ ग्राम कोश निधीमधून निबंध स्पर्धा, सामान्यज्ञान स्पर्धा, आनंद मेळावा स्पर्धा, अचूक वेध नेमबाजी स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा, लिंबू चमचा शर्यत आणि विज्ञान प्रदर्शन विशेष प्राविण्य मिळविलेल्या ६७ विद्यार्थ्यांना वह्या, पॅड, पेन बक्षीस स्वरूपात वाटप केले.
बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य जिजाबाई खोकले, सरपंच संगीताताई प्रवीण मिराशे,ग्रामसेवक फरीद शेख,तलाठी गजानन सुरोशे, उपसरपंच बाबुराव वाघमारे, पोलीस पाटील पंडित धात्रक,सेवा सोसायटी अध्यक्ष नवलविजय पवार, शाळा व्य. समिती अध्यक्ष दिगंबर देवसरकर, चंपत वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते अनिल राठोड, राम पवार, परमात्मा पवार,भगवान पवार, अबिराबाई वाघमारे, शांताबाई सोळंके, वनिता हनवते, अनिल धात्रक गावातील नागरिक आणि शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 टिप्पण्या