ढाणकी येथील प्रभाग 9 मध्ये पाण्याची नासाडी,


ढाणकी प्रतिनिधी 
नुकतीच नगर पंचायत झालेल्या ढाणकी पुढील समस्ये चा पाढा संपता संपत नाही आहे. येथील प्रभाग 9 मधील जुन्या जिंन प्रेस मध्ये हनुमान मंदिरा जवळ मोठी पाईप लाईन फुटल्या  मुळे दरवेळेस लाखो लिटर पाणी वाया जात आहे.  
यवतमाळ जिल्यात सर्वात जास्त पाण्यासाठी दुष्काळी गाव म्हणून ढाणकी ला ओळखलं जाते.  मात्र पाण्याच्या अश्या नासाडी मुळे गावकर्यां मध्ये नाराजी दिसत आहे. 
निवडणुकी च्या वेळी अनेक राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनामा मध्ये "आम्ही ढाणकी ची पाणी समस्या मिटवू " असे आश्वासन दिले होते. त्याच्यावर विश्वास ठेऊन जनतेने नगर सेवक निवडून दिले.  आता या नवीन नगर सेवक पुढे पाण्याची नासाडी थांबवून पाण्याचे योग्य नियोजन करणे हे महत्वाचे काम आहे. 
आता उन्हाळा सुरु होत आहे त्यामुळे पाणी असे वाया जाणे चांगले नाही.  तरी या वाया जाणाऱ्या पाण्याची नासाडी थांबवावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या