चार महिन्यांपासून ग्रामरोजगार सेवकांचे मानधन थकीत; उपासमारीची वेळ थकीत मानधन तातडीने अदा करण्याची संघटनेची मागणी.

 


उमरखेड प्रतिनिधी- तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांचे मागील चार महिन्यांपासून मानधन थकीत असल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. रोजगार हमीच्या कामांची जबाबदारी नियमितपणे पार पाडूनही मानधन वेळेवर मिळत नसल्याने ग्रामरोजगार सेवकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

ग्रामरोजगार सेवक हे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावतात. मजुरांना रोजगार उपलब्ध करून देणे, कामांची नोंद, उपस्थिती प्रक्रिया व विविध कागदपत्रांची पूर्तता करण्याची जबाबदारी ते पार पाडतात. मात्र, चार महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने घरखर्च, मुलांचे शिक्षण आणि दैनंदिन गरजा भागविणे कठीण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या वतीने उमरखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. थकीत मानधन तातडीने अदा करावे तसेच भविष्यात मानधन नियमित मिळण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली.

निवेदन देताना दिनेश हनवते, धोंडू माने, गुलाब बश्शी ,किसन जाधव ,मारोती जळके, संजय देशमुख, बबन वाढोरे, मारोती पोटे, फाजिल भाई, नारायन कदम ,कैलास खडसे ,सदानंद कदम, साहेबराव विनकरे,संजय वाघमारे,आंनदराव शिंन्दे, उत्तम रिठ्ठे,प्रभाकर सावते, गणेश शिन्दे यांच्यासह ग्रामरोजगार सेवक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या