पुणे येथील जमावबंदी उठवण्याची ढाणकी शहर काँग्रेस कमिटीची निवेदनाद्वारे मागणी. जमावबंदी लावणे हा तर लोकशाहीवर हल्ला- गजानन मिटकरे


ढाणकी प्रतिनिधी -लोकसभेचे विरोधी पक्षनेते  राहुल गांधी यांच्या २२ ऑगस्ट रोजी पुणे येथे आयोजित ‘छात्रों की गुंज’ या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात प्रशासनाकडून लागू करण्यात आलेली जमावबंदी तातडीने उठवण्यात यावी, या मागणीसाठी ढाणकी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना निवेदन सादर करण्यात आले.

काँग्रेसचे ढाणकी शहर अध्यक्ष गजानन मिटकरे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मा. राहुल गांधी यांचा ‘छात्रों की गुंज’ हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या व युवा वर्गाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी शांततापूर्ण व सनदशीर मार्गाने आयोजित केला आहे. मात्र, प्रशासनाकडून अशा प्रकारे जमावबंदी लादणे हे लोकशाहीच्या मूल्यांना तडे देणारे आहे. या निर्णयामुळे केवळ कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचेच नव्हे, तर पुण्यातील सामान्य नागरिक, व्यावसायिक व नोकरदारांचेही हाल होत आहेत. त्यामुळे प्रशासनाने ही अयोग्य जमावबंदी तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.

हे निवेदन बिटरगाव पोलीस स्टेशनचे जमादार सुदर्शन जाधव यांनी स्वीकारले. निवेदन देतेवेळी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस बाळासाहेब चंद्रे पाटील, जिल्हा काँग्रेस सचिव खाजा भाई कुरेशी, माजी उपनगराध्यक्ष जहीर जमीनदार, बाबुराव नरवाडे, बंटी वाळके, सुनील बुरसे, रमेश गायकवाड, आनंद पोपुलवाड, किशोर ठाकूर, राहुल नरवाडे,  साजिद कुरेशी, शिवाजी वैद्य , अमोल तुपेकर, रामराव गायकवाड, शेख सर, रुपेश भंडारी, प्रवीण जैन, अविनाश पांडे, सचिन तोटेवाड , वामनराव मुनेश्वर,  साहेबराव वाघमोडे, प्रशांत शेवाळकर , नामदेव मुरमुरे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवेदनाची प्रत माहितीसाठी मा. जिल्हाधिकारी साहेब व मा. पोलीस अधीक्षक साहेब यांनाही पाठवण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या