बिटरगाव बु येथे आठ मे रोजी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन. शासकीय योजनांचा लाभ आता एकाच छताखाली.

 


प्रशासनाला अधिक लोकाभिमुख करण्यासाठी आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी उमरखेड उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालयाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर (टप्पा-१) चे आयोजन करण्यात आले आहे. हे विशेष अभियान शुक्रवार, 8 मे 2026 रोजी सकाळी 9 वाजता वसंतराव नाईक कृषी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बिटरगाव (बु.) येथे संपन्न होणार आहे. या शिबिराच्या माध्यमातून महसूल सेवा, विविध दाखले आणि जमिनीची कामे एकाच ठिकाणी पूर्ण केली जाणार आहेत. शिबिरात प्रामुख्याने  उत्पन्न, रहिवासी, जातीचे प्रमाणपत्र, नॉन-क्रिमीलेयर आणि विद्यार्थ्यांसाठी लागणारे विविध दाखले ,७/१२ मधील चुकांची दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२ व ८-अ वाटप आणि प्रलंबित फेरफार प्रकरणांचा निपटारा, सामाजिक अर्थसाहाय्य योजनांचे लाभ, घरकुलांसाठी पट्टे वाटप, ई-मोजणी अर्ज आणि पीएम-किसान नोंदणी. तसेच  केवळ शासकीय कागदपत्रेच नव्हे, तर नागरिकांच्या आरोग्यासाठी या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिरही आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये रक्तगट, बी.पी., शुगर, ई.सी.जी. आणि सिकलसेल आजाराची मोफत तपासणी केली जाईल. तसेच एस.टी. महामंडळाचे सवलत कार्ड वाटप आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला जाणार आहे. या शिबिरात महसूल विभागासह आरोग्य, कृषी, समाज कल्याण, भूमी अभिलेख, महिला व बाल विकास आणि पोलीस विभाग अशा विविध विभागांच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. नागरिकांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी आपल्या भागातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) किंवा गजानन सुरोशे ,मंडळ अधिकारी यांच्याकडे आवश्यक सेवांचे अर्ज शिबिराच्या तारखेपूर्वी जमा करावेत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या