ढाणकी नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा अर्चना सुंदरकांता वासमवार यांचा पदग्रहण सोहळा आज, ८ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता नगरपंचायत सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि दोन्ही शिवसेना, काँग्रेस एम.आय.एम.च्या नेत्यांच्या साक्षीने हा सोहळा संपन्न झाला.
विकासासाठी एकत्र येण्याचे खासदारांचे आवाहन.
याप्रसंगी बोलताना खासदार नागेश पाटील आष्टीकर म्हणाले की, "ढाणकीतील मतदारांनी शिवसेनेवर जो विश्वास दाखवला आहे, त्याला तडा जाऊ दिला जाणार नाही. निवडणुका संपल्या आहेत, आता सर्व नगरसेवकांनी मिळून शहराच्या विकासासाठी झटले पाहिजे." तसेच ढाणकीचा पाणीप्रश्न आणि इतर प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.माजी नगराध्यक्ष सुरेश जयस्वाल यांनी आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील कामांचा लेखाजोखा मांडला आणि नवनिर्वाचित नगराध्यक्षांसह सर्व सदस्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल् या सोहळ्याला शिवसेना (दोन्ही गट), काँग्रेस आणि एम.आय.एम.चे नवनिर्वाचित नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत जोशी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार संभाजी गोरटकर यांनी मानले. ढाणकी शहरातील चारही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने जमले होते. नवनिर्वाचित नगराध्यक्ष यांनी शहरातील मतदार बंधूंचे यावेळी आभार मानले व शहराचा सर्वांगीण विकास करण्याचे आश्वासन दिले.

0 टिप्पण्या