ढाणकी प्रतिनिधी: मकरंसंक्रांत या सणाची महिला मोठ्या उत्साहाने वाट पाहत असतात. या सणाला महिला आपापल्या घरी मोठ्या आनंदाणा साजरे करतात. आपल्या गावातील परिचित सर्व महिला यांना बोलावून त्यांना हळदीकुंकू लावून,तीळ गूळ, वाण देऊन स्वागत केल्या जाते. स्वरांगिणी दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने मकर संक्रांतीच्या निमित्ताने 'हळदी-कुंकू' कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला गावातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, सुमारे २०० ते ३०० महिलांची उपस्थिती होती. भारतीय संस्कृतीतील सण-उत्सवांचे जतन करण्यासोबतच महिलांचे संघटन मजबूत व्हावे, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे मुख्य नियोजन सौ. मोहिनी पंकज केशेवाड यांनी पुढाकार घेऊन केले. त्यांना मंडळातील सर्व महिला सदस्यांनी मोलाची साथ दिली.पारंपारिक सोहळा: जमलेल्या सर्व महिलांनी एकमेकींना हळदी-कुंकू लावून आणि वाण देऊन शुभेच्छा दिल्या. ढाणकी गावातील विविध वयोगटातील २०० ते ३०० महिला या सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या, ज्यामुळे कार्यक्रमाला मोठ्या समारंभाचे स्वरूप आले होते.केवळ आयोजकच नव्हे, तर मंडळाच्या प्रत्येक भगिनीने हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.यावेळी बोलताना मोहिनी केशेवाड यांनी सांगितले की, "अशा उपक्रमांमुळे गावातील महिलांना एकत्र येण्याची संधी मिळते आणि विचारांची देवाणघेवाण होते. स्वरांगिणी मंडळ भविष्यातही असेच विधायक कार्यक्रम राबवत राहील."
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वरांगिणी दुर्गोत्सव मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. उपस्थित महिलांसाठी चहा पाण्याची देखील उत्तम सोय करण्यात आली होती

0 टिप्पण्या