जिल्हा परिषद उर्दू हायस्कूलच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सय्यद बबलू तर उपाध्यक्ष पदी शेख जुबेर यांची निवड.


ढाणकी प्रतिनिधी: येथील जिल्हा परिषद उर्दू हायस्कूलच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. यामध्ये सय्यद बबलू सय्यद सरदार यांची अध्यक्षपदी, तर शेख जुबेर शेख हबीब यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. स्थानिक पातळीवर ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती. शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडीकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले होते. अखेर, सदस्यांच्या चर्चेनंतर आणि सर्वांच्या संमतीने ही निवड करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. निवड प्रक्रिया पार पाडताना मुख्याध्यापक शेख मुद्दसीर, केंद्रप्रमुख आनंद कुंबरवार व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या