ढाणकी नगरपंचायत विषय समित्यांची निवड संपन्न; नगराध्यक्ष अर्चना वासमवार यांच्या अध्यक्षतेखाली 4 स्थायी समिती गठीत.


ढाणकी नगरपंचायतीच्या सन २०२६ या वर्षासाठीच्या विविध विषय समित्यांच्या निवडीची प्रक्रिया नुकतीच उत्साहात पार पडली. विषय समित्या निवडी वेळी नियोजन समिती वगवण्यात आली. नियोजन समिती वागळल्या मुळे चार समितीवर सत्ता धारी व विरोधक यांना समाधान मानावे लागले. दोन्ही बाजू कडे समसमान संख्याबळ असल्यामुळे आज होणाऱ्या विषय समित्या कडे नागरिकांचे लक्ष लागून होते. उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि नगरपंचायत मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड प्रक्रिया राबवण्यात आली. यामध्ये सत्ताधारी व विरोधक यांच्या कडून चार ही समित्या करीता एक, एकच नाव गटप्रमुख यांनी दिल्याने चार ही समित्या बिन विरोध झाल्याचे पिठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांनी घोषित केले. नगरपंचायतीच्या प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी महत्त्वाच्या समित्यांचे अध्यक्ष आणि सदस्य निश्चित करण्यात आले आहेत. स्थायी समितीची स्थापना नगरपंचायतीच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारी स्थायी समिती खालीलप्रमाणे स्थापन करण्यात आली आहे:

श्रीमती अर्चना सुंदरकांता वासमवार (अध्यक्षा,नगरपंचायत): पदसिद्ध अध्यक्षा स्थायी समिती .

१. सार्वजनिक बांधकाम समिती- सौ.शायदाबी शेख मिरांजी

२. स्वच्छता, वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य समिती- श्री. दत्तदिगंबर श्रीकृष्ण वानखेडे (उपाध्यक्ष न प ढाणकी) 

३. पाणीपुरवठा आणि जल निस्सारण समिती -श्रीमती यास्मिन अख्तर मुनव्वर रहमान.

४. महिला आणि बाल कल्याण समिती- सौ. दुर्गा साईनाथ मंतेवाड .

या निवडीनंतर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व समित्या जोमाने काम करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या