अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ढाणकीत 'कडकडीत बंद'.


ढाणकी प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जनसामान्यांचे नेते अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काल ढाणकी शहरात अभूतपूर्व 'कडकडीत बंद' पाळण्यात आला. स्थानिक व्यापारी, विविध संघटना आणि नागरिकांनी पुकारलेल्या या आवाहनाला शहरात १०० टक्के प्रतिसाद मिळाला असून, संपूर्ण बाजारपेठेत शांतता पसरली होती. सकाळी नऊ वाजल्यापासूनच ढाणकीतील सर्व छोटी-मोठी दुकाने, मुख्य बाजारपेठ आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली. केवळ अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार थांबवून नागरिकांनी आपल्या लाडक्या नेत्याप्रती आदर व्यक्त केला. शहराच्या मुख्य चौकात अजित दादांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. अजित दादांचे कणखर नेतृत्व आणि विकासाची दृष्टी नेहमीच प्रेरणादायी राहिली आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून काढता येणार नाही," अशा शब्दांत मान्यवरांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली या श्रद्धांजली सभेत  सर्वपक्षीय नेते यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या