ढाणकी प्रीमियर लीग 2026: ‘मॉर्निंग वॉरियर्स’ ठरले मैदानाचे किंग; तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर क्रिकेटचा थरार संपन्न!


ढाणकी प्रतिनिधी: येथील दत्त मंदिर परिसर, टेंभेश्वर नगर येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेली 'ढाणकी प्रीमियर लीग (२०२६)' अत्यंत चुरशीच्या वातावरणात पार पडली. मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित या स्पर्धेत 'मॉर्निंग वॉरियर्स' संघाने आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर विजेतेपदावर नाव कोरले. गेल्या तीन वर्षांपासून क्रिकेट प्रेमी या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत होते. यावर्षी एकूण ८ ताकदवर संघांमध्ये ही लढत रंगली. अंतिम सामन्यात 'मॉर्निंग वॉरियर्स' आणि 'टीचर इलेव्हन' यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळाली. मात्र, मोक्याच्या क्षणी उत्कृष्ट गोलंदाजी आणि फलंदाजीच्या जोरावर मॉर्निंग वॉरियर्सने बाजी मारली तर तृतीय क्रमांक: मॉर्निंग फायटर्स यांनी पटकावला. या स्पर्धेत पत्रकार इलेव्हन, नगर पंचायत इलेव्हन, बिटरगाव पोलीस स्टेशन इलेव्हन, बिझनेस असोसिएशन आणि सेविअर्स (मेडिकल इलेव्हन) यांसारख्या विविध क्षेत्रांतील व्यावसायिकांच्या संघांनी सहभाग नोंदवला होता. २३ जानेवारी ते २६ जानेवारी दरम्यान रंगलेल्या या क्रिकेट उत्सवामुळे टेंभेश्वर नगर परिसरात उत्साहाचे वातावरण होते. तीन वर्षांच्या प्रदीर्घ खंडानंतर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. खेळाडूंचा उत्साह आणि क्रीडाप्रेमींचा प्रतिसाद पाहून हे आयोजन यशस्वी झाल्याचे समाधान वाटले," असे आयोजकांनी यावेळी सांगितले. स्पर्धेच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना आकर्षक चषक आणि बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यावेळी स्थानिक नागरिक आणि क्रीडा शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या