ढाणकी शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संजय भोसले, उपाध्यक्षपदी उदय पुंडे तर सचिवपदी नागेश महाजन.


कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात ढाणकी शहर पत्रकार संघाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये ढाणकी शहर पत्रकार संघाची २०२६ - २७ ची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.  यावेळी पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष ब्रह्मानंद मुनेश्वर यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांच्या अध्यक्षतेखाली नवीन कार्यकारिणीचे गठन करण्यात आले असून ढाणकी शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संजय भोसले, उपाध्यक्षपदी उदय पुंडे तर सचिवपदी नागेश महाजन यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सहसचिवपदी गजानन गंजेवाड, कोषाध्यक्षपदी नंदकिशोर जाधव, प्रसिद्धी प्रमुखपदी राहुल चौरे यांची अविरोध निवड करण्यात आली.  यावेळी सदस्य म्हणून प्रशांत जोशी, विनोद गायकवाड, ब्रह्मानंद मुनेश्वर, सुनील अक्कावार , स्वप्निल चिकाटे, मोहन कळमकर, सुभाष कस्तुरे ,पंजाब भूतनर, कैलास घुगरे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या